३० मिनिटांत पिझ्झा तुमच्या दारात आला नाही तर फ्री.. ही ऑफर वाचूनच अनेकांचे डोळे चकाकतात. अनेकांना वाटतं की या ऑफरवर लवकरात लवकर पिझ्झा मिळेल किंवा उशीर झाला तर फ्रीमध्ये पिझ्झा मिळेल. असेही अनेक लोक आहेत जे डिलेव्हरी बॉयला पिझ्झा आणायला काही मिनिटांचा उशीर झाला तर त्याच्यावर डाफरतात. फ्री पिझ्झाची मागणी करतात.