कोणत्या क्षेत्रात नोकरी करावी हे समजत नाहीये, डिजिटल युगात या आहेत नोकऱ्या!

कोणत्या क्षेत्रात नोकरी करावी हे समजत नाहीये, डिजिटल युगात या आहेत नोकऱ्या!

वेगाने वाढत चालेल्या या टेक्नॉलाॅजी आणि डिजिटलायझेशनच्या काळात मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये प्रोफेशनल लोकांची खूप गरज असते.

  • Share this:

09 जून : वेगाने वाढत चालेल्या या टेक्नॉलाॅजी आणि डिजिटलायझेशनच्या काळात मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये प्रोफेशनल लोकांची खूप गरज असते. असे प्रोफेशनल लोक जे मोबाइल इंटरनेट आणि क्लाऊड टेक्नॉलाॅजीशी जवळ असतात तेच लोक काहीतरी जगाच्या वेगळे करू शकतात असं समजलं जातं. म्हणूनच जर डिजिटलच्या युगात तुम्ही जॉब शोधताय तर या काही स्किलसची माहिती असणं आवश्यक आहे.

डेटा रिसर्चर्स

मोठ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची माहिती संपादन करणारे आणि त्याच्यावर रिसर्च करणाऱ्या प्रोफेशनल लोकांची गरज असते. डिजिटल जगात माहिती तर वेगाने येत असते परंतु त्या माहितीचं विश्लेषण करणं किंवा योग्य रितीने प्रेझेंट करणं हे कंपनीला नेहमीच प्रोफेशनल लोकांकडून अपेक्षित असते.

3D डिझायनर्स्

जगात 3D डिझायनर्सच्या वाढत्या मागणीमुळे 3D डिझायनर्स आणि 3D कंपन्यांची गरज आहे. ग्राहकांना 3D डिझायनर्सच्या माध्यमातून एखाद्या गोष्टींकडे आकर्षित करण्यासाठी अशा 3D डिझायनर्स् प्रोफेशनल लोकांची निवड केली जाते.

सोशल मीडिया मार्केटिंग

सोशल मीडिया मार्केटिंग हे  बदलत्या जगात शक्तिशाली माध्यम ठरलं आहे. यामुळे एखाद्या व्यवसायाची खरेदी-विक्री करणं सोपं झालं आहे. एवढंच नव्हे तर कोणत्याही ब्रँडची ओळख किंवा लॉयल्टी किती आहे हे समजून येतं.म्हणूनच सोशल मीडिया मार्केटिंग हा एक नवीन ट्रेंड चालू झाला असल्यामुळे कंपनी अशा प्रोफेशनल लोकांच्या नेहमीच शोधात असते.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

कम्प्युटरमध्ये पदवी मिळवून मोठमोठ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची नोकरी मिळू शकते. .

फुल स्टॅक डेव्हलपर्स

PHP, HTML, CSS किंवा जावा स्क्रिप्ट यांसारख्या गोष्टींमध्ये काम करणाऱ्या अशा फुल स्टॅक डेव्हलपर्स लोकांची खास इंडस्ट्रीमध्ये गरज असते. कोणत्याही प्रोफेशनल माणसाला या सगळ्या तांत्रिक गोष्टींमध्ये तरबेज असणं जरुरीचं असतं. तसंच त्याच्याशी संबधित इतर ज्ञान असणं आवश्यक आहे. फोटोशॉपसारख्या डिझाइन्सच्या सॉफ्टवेअरची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे.

First Published: Jun 9, 2017 04:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading