मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Hats off: अपघातात गमावले दोन्ही पाय, मात्र आज स्वत:च्या पायावर उभं राहून दुसऱ्यांना शिकवतेय योगासनं

Hats off: अपघातात गमावले दोन्ही पाय, मात्र आज स्वत:च्या पायावर उभं राहून दुसऱ्यांना शिकवतेय योगासनं

ताकद आणि हिंमत शरीरात नाही तर आपल्या मेंदूत असते असं म्हटलं जातं. या तरुणीची कथा वाचून यावर विश्वास बसतो.

ताकद आणि हिंमत शरीरात नाही तर आपल्या मेंदूत असते असं म्हटलं जातं. या तरुणीची कथा वाचून यावर विश्वास बसतो.

ताकद आणि हिंमत शरीरात नाही तर आपल्या मेंदूत असते असं म्हटलं जातं. या तरुणीची कथा वाचून यावर विश्वास बसतो.

हैदराबाद, 26 फेब्रुवारी : जगताना आपण अनेकदा असे लोक पाहतो, ज्यांना पाहून मनात असा प्रश्न उमटतो, की यांच्यात इतकी हिंमत कुठून येते? हे  असं करू तरी कसं शकतात? असाच प्रश्न सध्या नेटकऱ्यांना एका तरुणीकडे पाहून पडला आहे.

या तरुणीचं नाव आहे अर्पिता रॉय. (Arpita Roy from Hyderabad) अर्पिताचं वय 33 वर्ष आहे. तिचे दोन्ही पाय रस्त्याच्या अपघातात कापले गेले. (Arpita physically challenged yoga instructor) मात्र ती अजिबातच खचून गेली नाही. ती आज एक यशस्वी योगा टीचर आहे. ती अनेकांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं योगा करण्यासह आनंदी राहायला शिकवते.(Arpita Roy yoga teacher on Instagram)

Indian Expressने दिलेल्या वृत्तानुसार, ती सांगते, की शरीराचा कुठला अवयव गमावल्यावर आयुष्य  खरं पाहता तितकंसं सोपं नसतं. ती स्वतःही योगाच्या माध्यमातून आतून-बाहेरून इतकी मजबूत बनली आहे, की आता ती लोकांनाही सहजपणे योगा शिकवते. 2006 मध्ये अर्पिता एका रस्त्याच्या अपघाताला बळी पडली. ती बाईकवरून पडली होती. मागून येणाऱ्या ट्रकनं तिचे पाय चिरडले.

ती सांगते, की या काळात मी अगदीच उन्मळून पडले होते. डॉक्टर तिला रक्त द्यायचे. ती हळूहळू रिकव्हर होत होती. मात्र हे अजिबातच सोपं नव्हतं. यानंतर तिनं हिमतीनं उभारी घेतली. एम्प्युटेट लेग्ज लावून घेतले. अपघातानंतर चार महिने तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावं लागलं. भयानक हे, की तिच्या 80 टक्के शरीरात गँगरीन झालं होतं. हे कृत्रिम पाय लावून घेतल्यावर लोक तिच्याकडे विचित्र नजरेनं बघायचे. मात्र ती अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकली.

View this post on Instagram

A post shared by Arpita (@royarpita_yoga)

तिनं सांगितलं, की लोक बघायचे की ती  कशी चालते, कुणासोबत चालते. तिनं हळूहळू लोकांकडं ध्यान न देण्याची कला शिकून घेतली. ती स्वतःवर काम करायला शिकली. तिनं आधी स्वतःला स्वीकारलं, स्वतःच्या शरीराला समजून घेतलं. मग आपल्या नव्या शरीराला तिनं आपलंसं केलं. यातून तिला मानसिक आणि शारीरिक पातळीवर शांतता मिळाली. हे समाधान तिचं आयुष्य बदलणारं होतं.

तिला योगा करताना पाहून अनेक नामवंत खेळाडूंनी तिची प्रशंसा केली. ती आता लोकांनाही योगा शिकवते. ती सांगते, की आयुष्याकडे बघण्याची तिची दृष्टी योगानंच बदलली. ती म्हणते, की वाईट वेळ आली असेल तर ती जाईलसुद्धा.

हेही वाचा याला म्हणतात Real Hero, चिमणीचं घरटं वाचवण्यासाठी शेतकऱ्याने सोडलं स्वत:चं शेत

अर्पिताकडून आपण हे नक्कीच शिकू शकतो, की आयुष्य हे थकून, हरून जात निराश होण्यासाठी नाही तर जगण्या आणि जिंकण्यासाठी आहे.

First published:

Tags: Hyderabad, Inspiring story