Home /News /lifestyle /

मलायका अरोराचा बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोना; घरातच झाला क्वारंटाइन

मलायका अरोराचा बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोना; घरातच झाला क्वारंटाइन

कपूर कुटुंबातील स्टाफनंतर आता त्यांच्या कुटुंबातील सदस्य अभिनेता अर्जुन कपूरलाही (Arjun kapoor) कोरोनाचं निदान झालं आहे.

  मुंबई, 06 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun kapoor) कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाली आहे. अर्जुन कपूरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह (Arjun kapoor covid-19)  आला आहे. आपल्याला कोरोनाचं निदान झाल्याची माहिती अर्जुन कपूरने स्वत: आपल्या सोशल मीडियावर दिली आहे. आपल्याला कोरोनाचं निदान झालं. मात्र कोणतीही लक्षं नाहीत. त्यामुळे आपण होम क्वारंटाइन असल्याचं अर्जुनने सांगितलं. अर्जुन कपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. ज्यामध्ये त्याने आपल्याला कोरोना असल्याचं सांगितलं आहे. अर्जुन म्हणाला, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली हे तुम्हाला सांगणं माझी जबाबदारी आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नाही आणि मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पूर्णपणे बरा होईपर्यंत घरातच आयसोलेशनमध्ये आहे. माझ्या आरोग्याबाबत ही महिती देत राहेन"
  View this post on Instagram

  🙏🏽

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

  "अशा अनिश्चित स्थितीत माणुसकीच या व्हायरला हरवेल असा विश्वास मला आहे", असंही अर्जुन म्हणाला. हे वाचा - 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील नट्टू काकांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल फिल्म निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर. मे महिन्यातच बोनी कपूर यांच्या घरातील स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. त्यानंतर बोनी कपूर यांनी स्टेटमेंट जारी केलं होतं. मी आणि माझी मुलं ठिक असल्याची माहिती त्यांनी दिली होती. तसंच लॉकडाऊननंतर आमच्यापैकी कोणीही घराबाहेर गेलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यांचा स्टाफने कोरोनाव्हायरसवर मातदेखील केल्याची त्यांनी माहिती दिली होती. दरम्यान आता अर्जुन कपूरला कोरोनाचं निदान झालं आहे. हे वाचा - 'साराला प्रपोज करणार होता सुशांत पण...' फार्महाऊसच्या केअर टेकरचा दावा अर्जुन कपूरने 2012 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इश्कजादे ही त्याची पहिली फिल्म. त्यानंतर त्याने 2 स्टेट्स, गुंडे, फाइंडिग फॅनी, हाफ गर्लफ्रेंड, मुबांँरका या फिल्ममध्ये काम केलं. पानीपतमध्येही तो कीर्ती सनोन आणि संजय दत्तसह दिसला. आता संदीप और पिंकी फरार आणि भूत पोलीस या फिल्ममध्ये दिसणार आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Arjun kapoor, Coronavirus

  पुढील बातम्या