मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गर्भपाताबाबत या कर्मठ देशाने घेतला मोठा निर्णय; बदलले Abortion कायदे

गर्भपाताबाबत या कर्मठ देशाने घेतला मोठा निर्णय; बदलले Abortion कायदे

धर्मात मंजुरी नाही म्हणून गर्भपाताला कायदेशीर मान्यता (Abortion laws) न देणाऱ्या काही मोठ्या देशांपैकी एक म्हणून अर्जेंटिना (Argentina) हा लॅटिन अमेरिकेतला देश ओळखला जात होता. पण...

धर्मात मंजुरी नाही म्हणून गर्भपाताला कायदेशीर मान्यता (Abortion laws) न देणाऱ्या काही मोठ्या देशांपैकी एक म्हणून अर्जेंटिना (Argentina) हा लॅटिन अमेरिकेतला देश ओळखला जात होता. पण...

धर्मात मंजुरी नाही म्हणून गर्भपाताला कायदेशीर मान्यता (Abortion laws) न देणाऱ्या काही मोठ्या देशांपैकी एक म्हणून अर्जेंटिना (Argentina) हा लॅटिन अमेरिकेतला देश ओळखला जात होता. पण...

ब्युनॉस आयर्स, 31 डिसेंबर : जगातल्या काही पारंपारिक रुढी पाळणाऱ्या पुराणमतवादी देशांपैकी एक असलेल्या अर्जेंटिनाने गर्भपाताविषयी (Abortion Law in Argentina) नवीन कायदा समंत केला आहे.  लॅटिन अमेरिकेतला (Latin America) गर्भपाताला कायद्याने मान्यता देणारा हा सर्वात मोठा देश ठरला आहे. प्रजनन हक्कांची बाजू घेणारे हे लोण अन्य प्रांतातही पोहोचणार असून, अन्य समाजवादी, पुराणमतवादी राष्ट्रेदेखील या हक्कांना संमती मिळावी यासाठी दबाव आणतील अशी स्थिती आहे. लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य असलेल्या अर्जेंटिनाने (Argentina) बुधवारी गर्भपाताला (Abortion) कायदेशीर मंजुरी दिली. या मागणीसाठी गेली अनेक वर्षे पुराणमतवादी भागातील तळागाळातील कार्यकर्त्यांनी केलेल्या चळवळी, आंदोलने, राजकीय सत्तेत घडवून आणलेले बदल यांचा हा विजय असल्याचे मानले जात आहे. सर्वेच्च नियामक मंडळाने यास मंजूरी देण्यासाठी मतदानाचा निर्णय घेतला. यावेळी 38-29 असे मतदान झाले. त्यानंतर मंडळात या निर्णयाबाबत सुमारे 12 तास प्रदीर्घ चर्चा, वादविवाद झाले. त्यानंतर या उपाययोजनेला मंजुरी मिळल्याचे बुधवारी पहाटे जाहीर करण्यात आले. यामुळे प्रबळ रोमन कॅथालिक चर्चचा प्रभाव कमी होणार असून, स्त्रीवादी चळवळीला बळ मिळणार आहे. दक्षिणेकडील न्युक्विन प्रांताच्या सिनेट सदस्य लुसिला क्रेक्सेल म्हणाल्या, की गर्भपात करण्याबाबतची विचारपद्धती मी बदलेली नाही. 2018 पासून मी या मतापासून दूर राहिले आहे. मी या समस्येपर्यंत कसे पोहोचावे, यापेक्षा मला कसे वाटते, यावर मी लक्ष केंद्रीत केले आहे. ही बाब स्त्रीत्व किंवा धर्माच्या अनुषंगाने नाही. गुप्तपणे केलेला गर्भपात ही एक मूक अशी विकृती आहे की जी मारते, हानी पोहोचवते आणि दुःखद कथांची निर्मिती करते. असा खुलासा होताच सर्वेच्च नियामक मंडळात विरोधक आणि गर्भपात हक्क समर्थकांमध्ये जोरदार वादविवाद झाले. त्यानंतर त्यांनी काग्रेसच्या निओ क्लासिकल पॅलेसमधील प्लाझामध्य तळ ठोकत जोरदार घोषणाबाजी केली आणि विरोधातील सिनेटर्स आपला अविश्वास सोडवा, अशी प्रार्थना केली. अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीस यांनी या विधेयकाचे कायद्यात (Law) रुपांतर करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करण्याचे मान्य केले आहे. यानुसार आता महिलांना कोणत्याही कारणास्तव 14 आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येणार आहे. मात्र यास बलत्काराची घटना किंवा महिलांचे आरोग्य हे अपवाद असतील. या कायद्याचे परिणाम लॅटीन अमेरिकेतील अन्य देशांमध्येही पसरण्याची शक्यता आहे. अन्य समाजवादी किंवा पुराणमतवादी राष्ट्रांमध्ये या कायद्याचा जबरदस्तीने पाठपुरावा होण्याची शक्यता आहे. क्युबा, उरुग्वे आणि गुयाना या देशांमध्ये विनंतीनुसार गर्भपातास परवानगी दिली जाते. अर्जेंटिनाने यापुर्वी बलात्कारांच्या घटनांमध्ये किंवा गर्भधारणेमध्ये स्त्रीच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास गर्भपात करण्यास परवानगी दिली होती. मात्र लॅटिन अमेरिकेतील अन्य देशांमध्ये मात्र याबाबत कठोर मर्यादा आणि प्रतिबंध आहे. याबाबत ह्यूमन राईटस वॉचचे (Human Rights Watch) अमेरिकेचे उपसंचालक तमारा तारासियुक ब्रोनर म्हणाले, की अर्जेंटिनाने गर्भपातास कायदेशीर मंजूरी दिल्याने हा एक मोठा विजय असून यामुळे मुलभूत हक्कांचे संरक्षण होईल, तसेच लॅटीन अमेरिकेतील परिवर्तनास प्रेरणा मिळेल. यामुळे काही एकत्र येतील, असा अंदाज आहे. ज्यासाठी आम्ही लढा देत होतो, ती गोष्ट आता प्रत्यक्षात उतरत आहे, असे सांगत या कायद्याच्या समर्थकांनी मतदानाची घोषणा होता एकच जल्लोष केला. याबाबत 27 वर्षीय मारियो ब्लान्को म्हणाली, की मी रडणे थांबवू शकत नाही. ज्या गोष्टीची आपण दिर्घकाळ वाट पाहत होतो. ती गोष्ट आता प्रत्यक्षात येत आहे, या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीये. मला काय करावे हेच सुचत नाही. अर्जेंटिनाने गर्भापाताविषयी केलेल्या कायद्यावर पोप फ्रान्सिन (Pope Francis) यांनी धक्कादायक टिका केली. ते म्हणाले, की आपल्या जन्मभूमीतील कडवट राजकीय वादविवाद हा मनाला टोचणारा ठरला. गर्भपाताविरोधात सक्रिय असलेल्या शेजारी गरीब राष्ट्रांमधील महिलांचे गटाचे कौतुक आहे. एकूणच देशात झपाट्याने वाढणाऱ्या इव्हॅलाजिकल प्रोटेस्टंट चर्च आणि कॅथॉलिक चर्चना हा निर्णय म्हणजे मोठा धक्का मानला जात आहे. या कायद्याच्या विरोधात असणाऱ्या आणि या कायद्याच्याविरोधात आंदोलन करताना ब्वेनोस एरर्समधून बाहेर पडलेल्या 27 वर्षीय अबीगिल परेरा म्हणाल्या, की जीवनाचा आदर न करणारा हा कायदा या देशात मात्र जिव्हाळ्याचा समजला जातो. मात्र यापुढेही मी झगडतच राहणार आहे. प्रशासनाच्या अजेंड्यावर महिलांचे हक्क केंद्रस्थानी असून अर्जेंटिनाचे मध्य- डावे पक्षांचे अध्यक्ष फर्नांडीस यांच्यासाठी हे मतदान एक विजय मानला जात आहे. प्रामुख्याने हा अर्जेंटिनातील तळागाळातील गर्भपात हक्कांची बाजू मांडणाऱ्या गटाचा विजय आहे. या गटांमुळे देशातील राजकीय आणि सांस्कृतिक रचनेत सखोल बदल घडवून आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यात विवाह समानता, लिंग समानता उपक्रम, ट्रान्सजेंडर्सच्या हक्कांचा समावेश आहे. अर्जेंटिना या बदलांचे प्रतिक बनला असून यामुळे बदलांचा मार्ग अधिक विस्तारला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अर्जेंटिनाच्या लोअर हाऊसमधील चेंबर आॅफ डेप्युटीजने 131-117 मतांनी हे विधेयक मंजूर केले. यातील समांतर उपाययोजना दोन वर्षांपूर्वी पास झाल्या मात्र 38-31 ने हे विधेयक खालच्या सिनेटमध्ये मंजूर होऊ शकले नव्हते. त्यावेळी अध्यक्ष मारिसिओ मॅक्ररी म्हणाले होते, की वैयक्तिकदृष्ट्या मी या कायद्याच्या विरोधात आहे. परंतु, काग्रेसने हे विधेयक तयार केले तर त्यास मनाई करण्याची आम्ही शपथ घेतली होती. फर्नांडीस यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान प्रचारात गर्भपाताचे हक्क,लिंग समानता, समलिंगी आणि ट्रान्सजेंडर्स यांच्या हक्कांबाबत आश्वासनांचा समावेश केला होता. त्यांनी केलेली आश्वासनपूर्ती पाहता विरोधक देखील आश्चर्य व्यक्त करीत आहेत. गर्भपात उपाययोजनांच्या समर्थक सेन नार्मा दुरंगो म्हणाल्या, की गर्भपात कायदेशीर केल्यामुळे या प्रथेच्या सावलीतून याची मुक्तता होईल. अर्जेंटिनात दरवर्षी गुप्तपणे लाखो गर्भपात केले जात होते. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये 40,000 महिलांना गर्भपातासंबंधी गुंतागुंत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्जेंटिनाच्या सेफ गर्भपात नेटवर्कच्या म्हणण्यानुसार 2016-18 दरम्यान गर्भपातात गुंतागुंत झाल्याने किमान 65 महिलांचा मृत्यू झाला होता. मंगळवारपासून झालेल्या चर्चेत बोलणाऱ्या पहिला महिल्या खासदार दुरंगो म्हणाल्या की छुप्या गर्भपातामुळे मरण पावलेल्या महिलांची प्रतिनिधी म्हणून आज मी येथे उपस्थित आहे. गर्भपात हे एक वास्तव असून ते प्राचीन काळापासून चालत आले आहे. अर्जेंटिना गर्भपातासंबंधी कायदा व्हावा, यासाठी गेल्या दशकभरापासून प्रयत्न सुरु होते. 2015 मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ स्थापन झालेल्या  नि उना मेनोस या स्त्रीवादी चळवळीमुळे यास अधिक प्रोत्साहन मिळाले. ही चळवळ म्हणजे गर्भपात कायदा अभियानाची प्रेरणा आहे. अर्जेंटिनामधील या प्रयत्नाचे प्रतिक हिरवा रुमाल मानले गेले. मेक्सिकोसह लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांमधील महिला त्यांच्या हक्कांना अधिक पाठिंबा मिळावा यासाठी  रस्त्यावर उतरत आहेत. अर्जेंटिनात सुरु झालेल्या या हिरवा रुमाल चळवळीने आता संपूर्ण प्रदेश व्यापला आहे, महिलांच्या समता केंद्राच्या कार्यकारी संचालिका पॉल –विला- गुइलन म्हणाल्या की मेक्सिको ते अर्जेंटिनापर्यंतच्या प्रदेशातील कार्यकर्त्यांनी गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळावी, यामागणीसाठी हातात हिरवा रुमाल परिधान केला आहे. सर्वेच्च नियामक मंडळाने मंगळवारी दुपारी उपाययोजना करण्याच्या काही तासांअगोदर पोप फ्रान्सिस यांनी राजकीय विवादांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मूठभर सिनेटर्सना त्यांची नेमकी भूमिका कळालीच नसल्याचा संदेश त्यांनी यावेळी जारी केला. प्रत्येक पुत्र हा देवाचे मूल आहे हे आम्हाला सांगायला देवाचा पुत्र जन्मला असे त्यांनी ट्विट केले होते. प्रत्येक मूल हे जन्माला आल्यानंतर ते अशक्त असते. त्याचा दुबळेपणा, कमकुवतपणा आपण प्रेमळपणे स्विकारण्यास शिकू असेही त्यांनी व्टिटमध्ये म्हणले आहे. कॅथाॅलिक आणि इव्हान्जेलिकलच्या नेत्यांनी निरपराध मुलांच्या हत्येबद्दल प्रार्थना आणि एक दिवस उपोषण करण्याचे आवाहन केले होते. तसेच देशात गर्भपातविरोधी मोर्चे देखील काढण्यात आले होते. विरोधकांनी मंगळवारी निळ्यारंगाचे कपडे घातलेल्या बाळाची आणि गर्भासारख्या दिसणाऱ्या बाहुल्याची प्रतिकृती तयार करुन त्यावर बनावट रक्त शिंपडत निषेध व्यक्त केला होता. फर्नांडीस हे कायद्याचे प्राध्यापक आहेत. त्यांनी दिर्घकाळ गर्भपात कायद्याचे समर्थन केले होते. 2019 च्या अखेरीस पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी हा कायदा करण्यास प्राधान्य दिले होते.मंदीमुळे विस्कळीत अर्थव्यवस्था आणि कोरोनामुळे लाकडाऊन करावे लागले असताना ही कायदा करणे ही मोठी राजकीय जोखीम होती. यामुळे अध्यक्ष फर्नांडीस आणि उपाध्यक्षा क्रिस्टीना फर्नांडीस डी कार्चनर यांना त्यांच्या अजेंड्यावरील या कायद्यासाठी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. 2007 ते 2015 या कालावधीत अध्यक्ष असणाऱ्या क्रिस्टीना फर्नांडीझ यांनी त्यावेळी  या कायद्याला विरोध देखील केला होता.2018मध्ये कायदेशीर गर्भपाताच्या समर्थनार्थ लाखो महिलांनी अर्जेंटिनामध्ये निदर्शने केली त्यामुळे क्रिस्टीन यांच्या भुमिकेत बदल झाला. यावेळी त्या म्हणाल्या की तुमची मुलगी आपला विचार बदलत असून ती महत्वाची भुमिका बजावेल. याबाबत गर्भपात हक्कांचे वकील सेलेस्ट मॅल डगल म्हणाले, की आमच्या आंदोलनामुळे अनेकांची पदे गेली. क्रिस्टीना फर्नांडीस डी कार्चनर यांचे मत देखील बदलले हे मोठे उदाहरण आहे. याबाबत 34 वर्षीय महिला सामाजिक कार्यकर्त्या मेलिना अलिग्रे म्हणाल्या,की  महिला चळवळी या कायद्यासाठी बराच काळ दबाव आणत होत्या. नवीन वर्षापूर्वीच या कायदयाला मान्यता मिळाली हे विशेष आहे.
First published:

पुढील बातम्या