'हे' नुकसान समजल्यानंतर तुम्ही चहासोबत बिस्किट खाणं लगेचच बंद कराल

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं अधिकृतरित्या सरकारी बैठकीत चहासोबत बिस्किट न देण्याची विनंती केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 09:46 PM IST

'हे' नुकसान समजल्यानंतर तुम्ही चहासोबत बिस्किट खाणं लगेचच बंद कराल

 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं अधिकृतरित्या सरकारी बैठकीत चहासोबत बिस्किट न देण्याची मागणी केली आहे. बैठकांदरम्यान केवळ पौष्टिक पदार्थच दिले जावेत, अशी विनंती मंत्रालयानं एका परिपत्रकाद्वारे केली आहे. यानंतर बैठकांदरम्यान बिस्किट खाण्यावर बंदी का घालण्यात आली आहे ? याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. पण हा निर्णय सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनंच घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं अधिकृतरित्या सरकारी बैठकीत चहासोबत बिस्किट न देण्याची विनंती केली आहे. बैठकांदरम्यान केवळ पौष्टिक पदार्थच दिले जावेत, अशी विनंती मंत्रालयानं एका परिपत्रकाद्वारे केली आहे. यानंतर बैठकांदरम्यान बिस्किट खाण्यावर बंदी का घालण्यात आली आहे ? याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. पण हा निर्णय सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनंच घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 चहासोबत बिस्किट खाल्ल्यानं आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. कारण बिस्किटांमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. साखरेच्या अतिसेवनामुळे त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. चेहऱ्यावर मुरमं येणे किंवा खूप कमी वयात सुरकुत्या येणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

 चहासोबत गोड बिस्किटं खाल्ल्यास तुमच्या दातांचंही आरोग्य धोक्यात येतं. यामुळे दात लवकर पडणे, दातांमध्ये पोकळी निर्माण होणे, दातांना किडदेखील लागू शकते.

नियमित स्वरुपात चहासोबत बिस्किट खात असाल तर अतिरिक्त वजन वाढणं आणि शरीरात इंसुलिनचं प्रमाणही वाढतं.

नियमित स्वरुपात चहासोबत बिस्किट खात असाल तर अतिरिक्त वजन वाढणं आणि शरीरात इंसुलिनचं प्रमाणही वाढतं.

तसंच सकाळी-सकाळी अधिक प्रमाणात कॅलरीजचे सेवन केल्यास आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं.

तसंच सकाळी-सकाळी अधिक प्रमाणात कॅलरीजचे सेवन केल्यास आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं.

Loading...

बिस्किटांमध्ये गरजेपेक्षाही जास्त साखर असते. त्यामुळे याच्या सेवनानं तुमची रोग प्रतिकारक क्षमताही कमी होते.

बिस्किटांमध्ये गरजेपेक्षाही जास्त साखर असते. त्यामुळे याच्या सेवनानं तुमची रोग प्रतिकारक क्षमताही कमी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 09:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...