मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मेथीदाणे आणि मेथीची पानं खाल्ल्यानं वजन घटतं? जाणून घ्या काय आहे सत्य

मेथीदाणे आणि मेथीची पानं खाल्ल्यानं वजन घटतं? जाणून घ्या काय आहे सत्य

वजन घटवण्याबाबत अनेक संशोधनं दररोज देश विदेशातून समोर येतात. आता मेथीबाबत एक अनोखी माहिती समोर आली आहे.

वजन घटवण्याबाबत अनेक संशोधनं दररोज देश विदेशातून समोर येतात. आता मेथीबाबत एक अनोखी माहिती समोर आली आहे.

वजन घटवण्याबाबत अनेक संशोधनं दररोज देश विदेशातून समोर येतात. आता मेथीबाबत एक अनोखी माहिती समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई ,20 डिसेंबर: मेथी (Fenugreek leaves) ही एक गुणकारी भाजी आहे. मेथी दाण्याचेही (Fenugreek seeds) अनेक फायदे सांगितले जातात. आता मात्र एका संशोधनातून (research) नवी बाब समोर आली आहे. मेथी खाल्याने ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते. मेथी वजन घटवण्याच्या प्रक्रियेतही मदतशील ठरू शकते. यासंदर्बात उंदरांवर प्रयोग केला गेला. फार्माकॉलॉजिस्ट प्रवीण कुमार (Pharmacologist Praveen Kumar) आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मिळून एक अभ्यास केला. 2014 साली केलेल्या या प्रयोगात असं आढळलं, की मेथीचे दाणे जाड उंदरांमधली चरबी घटवण्यासाठी मदतशील ठरली. असाच एक अभ्यास यंदा डॉ. अनाडोरा जे ब्रुस केलर (Dr Annadora J. Bruce-Keller) आणि इतरांनी केला होता. त्यांनी लावलेल्या शोधानुसार, मेथीनं हाय फॅट डायटच्या परिणामांना निष्प्रभ केलं. गट नावाच्या गुड बॅक्टेरियाला उत्तेजनही दिलं, जे अन्नपचनासाठी आवश्यक असतात. स्थुल व्यक्तींचा अभ्यास 2019 साली जाड लोकांबाबत फार्माकॉलॉजिस्ट Hugues Chevassus एक संक्षिप्त अभ्यास केला गेला. यातही मेथीदाण्याच्या सेवनाचा परिणाम तपासण्यात आला. सहा आठवड्यांमध्ये, काही जाड लोकांना नियमितपणे विशिष्ट प्रमाणात मेथीदाणे दिले गेले. त्यांची उर्जा पातळी, वजन, भूक, ग्लुकोज आणि इन्सुलिन पातळीवर त्याचे झालेले परिणाम अभ्यासले गेले. यात समोर आलं, की जाड लोकांनी स्निग्ध पदार्थांचं सेवन बऱ्यापैकी थांबवलं. मात्र वजनात घट दिसली नाही. (हे वाचा-Depression वर कशी करावी मात; तज्ज्ञांनी सांगितले सोपे उपाय) असा एक लोकप्रिय समज आहे, की मेथीदाण्यांचं पाणी किंवा मेथी चहा पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यावर आधारित एक अभ्यास जियॉंग बे यांनी केला. जाड कोरियन महिलांचा या संशोधनात सहभाग होता. या महिलांना मेथी चहा देण्यात आला. यातून भूक कमी झाल्याचं दिसून आलं. कमी खाल्लं गेल्याने वजनकाटा थोडाफार हलला. या अभ्यासातून दिसतं, की मेथी किंवा मेथीदाणे यांच्यात असे गुण असतात जे भूक कमी करण्यास मदत करतात आणि नियमित सेवन केलं तर वजन कमी करण्यास उपयोगी पडू शकेल.
First published:

Tags: Research, Weight loss

पुढील बातम्या