मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी करा सोपा उपाय; रात्री झोपताना बदाम तेल असं वापरा

चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी करा सोपा उपाय; रात्री झोपताना बदाम तेल असं वापरा

बदाम तेलाचा उपयोग

बदाम तेलाचा उपयोग

Skin care Marathi: चेहऱ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाचे तेल उपयोगी ठरेल. आज आम्ही तुम्हाला बदामाच्या तेलाचे अनेक फायदे सांगणार आहोत. त्यामुळे तुमच्या त्वचेचे सौंदर्य खुलेल आणि तुमच्या चेहरा ग्लोईंग दिसेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 16 नोव्हेंबर : आपली त्वचा सुंदर आणि ग्लोईंग असावी, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, त्यासाठी अनेकजण विविध घरगुती उपायांचा अवलंब करत असतात. रोजच काही घरगुती उपाय करणं शक्य होत नाही. त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या की स्त्री असो वा पुरुष कमी वयात वयस्क दिसू लागतो. चेहऱ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाचे तेल उपयोगी ठरेल. आज आम्ही तुम्हाला बदामाच्या तेलाचे अनेक फायदे सांगणार आहोत. त्यामुळे तुमच्या त्वचेचे सौंदर्य खुलेल आणि तुमच्या चेहरा ग्लोईंग दिसेल. अनेक पोषक तत्वांनी युक्त बदाम तेल तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया बदाम तेल लावण्याचे फायदे आणि ते वापरण्याची योग्य पद्धत.

चेहऱ्यावर बदामाचे तेल लावण्याचे फायदे

डाग कमी होतील -

रात्री झोपण्यापूर्वी कॉटन बॉलच्या मदतीने बदामाचे तेल चेहऱ्यावर लावून झोपा. त्यामुळे जुनाट काळे डाग हलके-फिकट होऊ लागतात.

मुरुमे-पिंपल्स -

बदामाच्या तेलामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमे आणि पिंपल्स कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये बदामाच्या तेलाचा वापर करा.

अनेक पोषक तत्वांनी युक्त बदाम तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अनेक पोषक तत्वांनी युक्त बदाम तेल तुमच्या त्वचेला आतून पोषण देईल.

डार्क सर्कल काढा -

रात्री झोपण्यापूर्वी थोडे बदामाचे तेल गुलाबपाणी आणि मध मिसळून लावल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.

सुरकुत्या घालवा -

बदामाच्या तेलात खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल मिसळून रात्री झोपण्यापूर्वी लावल्याने चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात.

बदाम तेल लावण्याची योग्य पद्धत -

जेव्हा तुम्ही बदामाचे तेल लावाल तेव्हा तुमचे हात चांगले धुवा आणि स्वच्छ पुसून घ्या. हात सुकल्यानंतर त्यावर बदामाच्या तेलाचे काही थेंब घेऊन दोन्ही हाताचे तळवे चांगले चोळून गरम करा आणि हे तेल चेहऱ्याला लावून काही वेळ मसाज करा.

हे वाचा -  डिप्रेशनमध्ये गेलेली माणसं सतत रागावतात; अशी लक्षणं असल्यास नक्की उपचाराची गरज

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

First published:

Tags: Skin, Skin care