Home /News /lifestyle /

स्कीन केअर प्रॉडक्ट नकोच! उन्हाळ्यात सुंदर चेहऱ्यासाठी सफरचंदाच्या सालीचा असा करा उपयोग

स्कीन केअर प्रॉडक्ट नकोच! उन्हाळ्यात सुंदर चेहऱ्यासाठी सफरचंदाच्या सालीचा असा करा उपयोग

सफरचंदाप्रमाणे सफरचंदाची साल (Apple peel) देखील उन्हाळ्यात खूप प्रभावी ठरू शकते. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सफरचंदाच्या सालीचा उपयोग करून तुम्ही प्रॉब्लेम फ्री चमकदार त्वचा सहज (Apple peel benefits for skin) मिळवू शकता.

    नवी दिल्ली, 14 मे : सफरचंद हा आरोग्याचा खजिना मानला जातो. पोषक तत्वांनी समृद्ध सफरचंद हे निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सफरचंदाचे सेवन शरीराला मजबूत बनवण्यासोबतच आजारांपासून दूर ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. सफरचंदाप्रमाणे सफरचंदाची साल (Apple peel) देखील उन्हाळ्यात खूप प्रभावी ठरू शकते. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सफरचंदाच्या सालीचा उपयोग करून तुम्ही प्रॉब्लेम फ्री चमकदार त्वचा सहज (Apple peel benefits for skin) मिळवू शकता. सफरचंदाच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. यासोबतच सफरचंदाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ईचा वापर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणूनच आज आम्‍ही तुम्‍हाला स्‍कीन केअरमध्‍ये सफरचंदाची साल वापरण्‍याच्‍या पद्धती आणि त्वचेवर सफरचंदच्‍या सालीचे काही आश्चर्यकारक फायदे सांगणार आहोत. त्वचेला moisturize करते - उन्हाळ्यात त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज वाटू लागते. अशा परिस्थितीत त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी सफरचंदाच्या सालीचाही वापर करू शकता. यासाठी सफरचंदाची साल आणि टोमॅटो बारीक करून पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये थोडे दही घालून चेहऱ्याला लावा. कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. हे वाचा - कुत्रा अचानक अंगावर आल्यावर असं चुकून पण करायचं नसतं; नाहीतर नक्की चावेल त्वचा उजळण्यासाठी - उन्हाळ्यात तुम्ही सफरचंदाच्या सालीला तुमच्या त्वचेचे ग्लोइंग सिक्रेट बनवू शकता. यासाठी सफरचंदाची साले वाळवून बारीक करून घ्या. आता सफरचंदाच्या सालीपासून बनवलेल्या पावडरमध्ये ताजे लोणी मिसळा आणि चेहऱ्यावर आणि मानेला चांगले लावा. नंतर कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून तीनदा वापरल्याने तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या उजळेल. हे वाचा - Shocking! जोशाजोशात गेला जीव; बाथरूममध्ये शारीरिक संबंधादरम्यान महिलेचा मृत्यू सफरचंदाच्या सालीचे त्वचेसाठी फायदे - सफरचंद शरीरातील अनेक रोगांशी लढण्यास मदत करते. त्याचप्रमाणे सफरचंदाची सालेही त्वचेवर खूप गुणकारी असतात. सफरचंदाच्या सालीपासून बनवलेला फेस पॅक वापरून उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या घालवता येतात. सफरचंदाची साल त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, टॅनिंग आणि पुरळ कमी होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Skin, Skin care

    पुढील बातम्या