Appendix च्या ऑपरेशननंतरची काळजी; काय करावं आणि काय नाही वाचा

Appendix च्या ऑपरेशननंतरची काळजी; काय करावं आणि काय नाही वाचा

बहुतेक लोकांचं Appendix चं ऑपरेशन होतं. याबाबत तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल.

  • Last Updated: Sep 10, 2020 09:46 PM IST
  • Share this:

अ‍ॅपेंडेक्टॉमी ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे ज्याद्वारे अ‍ॅपेंडिक्स काढून टाकला जातो. myupchar.com शी संबंधीत एम्सच्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं, अ‍ॅपेंडिक्स  एक पातळ आणि लहान नळी असते ज्याची लांबी 2 ते 3 इंच असते. मोठ्या आतड्यात, जिथं मल तयार होतो तेथे या आतड्या जोडल्या जातात. काहीवेळा अ‍ॅपेंडिक्सचा संसर्ग उद्भवतो, ज्यामुळे तो सूजतो. त्यामुळे रुग्णाला ओटीपोटात तीव्र वेदना, ताप येणे, भूक न लागणं किंवा उलट्या होणं अशी लक्षणं जाणवतात. जर अ‍ॅपेंडिक्स पोटात फुटलं तर समस्या आणखी गंभीर होऊ शकते आणि हे टाळण्यासाठी अ‍ॅपेंडेक्टॉमी नावाची शस्त्रक्रिया केली जाते.

अ‍ॅपेंडेक्टॉमी दोन प्रकारे होते

खुली अ‍ॅपेंडेक्टॉमी : myupchar.com शी संबंधीत डॉ. आयुष पांडे यांनी सांगितलं, या प्रक्रियेदरम्यान ओटीपोटात एक चीर देऊन उघडलं जातं आणि त्यातून डॉक्टर अ‍ॅपेंडिक्स बाहेर काढतात आणि नंतर ओटीपोटाला टाके लावून ती चीर बंद करून शस्त्रक्रिया पूर्ण करतात.

लेप्रोस्कोपिक अ‍ॅपेंडेक्टॉमी : या प्रक्रियेदरम्यान पोटात 3 किंवा 4 लहान चिरा बनवतात. त्यानंतर डॉक्टर अ‍ॅपेंडिक्स बाहेर काढण्यासाठी कॅमेरा आणि साधनं लावून शस्त्रक्रिया करतात. हे तंत्र वापरल्यास रुग्णाची तब्येत वेगाने बरी होते आणि खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत वेदना देखील कमी होते. तसंच पोटात टाके इत्यादींची खूणही राहत नाही आणि रुग्णालयात कमी वेळ उपचारासाठी राहावं लागतं.

अ‍ॅपेंडेक्टॉमीच्या आधी आणि नंतर अशा प्रकारे काळजी घ्या

आपण आधीपासूनच कोणतीही औषधं किंवा औषधी वनस्पती घेत असाल तर अ‍ॅपेंडेक्टॉमी शस्त्रक्रिया होण्यापूर्वी त्या डॉक्टरांना सांगणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त डॉक्टरांना अशा पदार्थांबद्दलही सांगितलं पाहिजे, ज्यांची अॅलर्जी असेल. यामुळे डॉक्टरांना उपचार करणं सोपं होतं. अ‍ॅपेंडक्टॉमी शस्त्रक्रियेपूर्वी काहीही खाऊ नका. त्याचवेळी शस्त्रक्रिया दरम्यान पोट देखील साफ केलं जातं.

जखमेला पाणी अजिबात लागू देऊ नका

अ‍ॅपेंडेक्टॉमी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ईसीजी, रक्तदाब इत्यादींची तपासणी केली जाते. जेणेकरून शरीरात काही बदल होत आहेत का त्याचं त्वरित निदान होऊ शकेल. जखम कोरडी होईपर्यंत, खाण्यापिण्यात देखील विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शस्त्रक्रियेनंतर एका आठवड्यापर्यंत आंघोळ करू नये. जखमेला अजिबात पाणी लागू देऊ नका. जेव्हा जखम कोरडी होऊ लागते तेव्हाच आंघोळ करा.

शस्त्रक्रयेनंतर या गोष्टी लक्षात ठेवा

  • शस्त्रक्रयेनंतर काही दिवस शौचालयात जाण्यात त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत नियमितपणे चालणं आवश्यक आहे जेणेकरून पोटाची स्नायू लवचिक राहतील आणि पाचक प्रणाली सहजतेनं कार्य करेल.
  • पचन चांगलं राहावं, म्हणून धान्य, सोयाबीन, हिरव्या भाज्या, गव्हाचा ब्रेड खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. शस्त्रक्रियेनंतर 8 दिवस द्रवपदार्थ खाणंदेखील फायदेशीर आहे.
  • काही रुग्णांना अ‍ॅपेंडेक्टॉमी शस्त्रक्रियेनंतर फुफ्फुसांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत दीर्घ श्वास घेणं किंवा खोकल्याचा व्यायाम करणं आवश्यक आहे. या वेळी प्राणायाम केल्यानं फायदा होतो.
  •  जड वस्तू पूर्णपणे निरोगी होईपर्यंत उचलू नयेत.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - अ‍ॅपेंडिक्स

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 10, 2020, 9:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading