• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • कोरोना की आणखी काही? फक्त खोकल्याचा आवाज ऐकून अ‍ॅप करणार आजाराचं निदान

कोरोना की आणखी काही? फक्त खोकल्याचा आवाज ऐकून अ‍ॅप करणार आजाराचं निदान

वेगवेगळ्या प्रकारच्या आजारात खोकण्याचा (Cough) आवाज वेगवेगळा असतो. त्यात नेमका काय आणि कसा फरक असतो, हे ओळखण्याचं प्रशिक्षण अ‍ॅपला दिलं जात आहे.

  • Share this:
मुंबई, 11 सप्टेंबर : आता आपल्याला साधा खोकला (Cough) झाला तरी मला कोरोना (Coronavirus) तर नाही झाला ना अशीच भीती वाटू लागते. सध्या कोरोनाचं लक्षण (Coronavirus symptoms) समजला जाणारा खोकला हा इतर आजारांचंही लक्षण (Symptoms of coronavirus) आहे हे आपण जवळपास विसरूनच गेलो आहोत. आता तुम्हाला असलेला खोकला नेमका कोणत्या आजाराचा हे फक्त तुमच्या खोकल्याच्या आवाजावरूनच (Detect disease by cough voice) समजू शकतं. शास्त्रज्ञांनी एक असं मोबाईल अ‍ॅप तयार करत आहेत, की जे खोकल्याचा केवळ आवाज ऐकून आजाराचं निदान (App Diagnose Disease With Cough) करू शकेल. हे अ‍ॅप विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञ खोकल्याच्या लाखो आवाजांचं रेकॉर्डिंग करत आहेत. डेलावेअरमधल्या Hyfe Inc या नावाच्या एका कंपनीकडून या अॅप्लिकेशनची निर्मिती केली जात आहे, असं वृत्त दी वॉल स्ट्रीट जर्नलने (The Wall Street Journal) दिलं आहे. ही कंपनी खोकल्याच्या आवाजाला आर्टिफिशियल ट्रेनिंगच्या (Artificial Training) सहाय्याने अ‍ॅपमध्ये फीड करत आहेत. एखाद्या व्यक्तीला अस्थमा, न्यूमोनिया, श्वासाचा त्रास, कोविड यांपैकी एखादा आजार झाला असेल, तर अ‍ॅप समोर ठेवून खोकल्यावर त्या व्यक्तीच्या आजाराचं नेमकं निदान होऊ शकणार आहे. हे वाचा - आता काखेतून कोरोनाचं निदान; घाम सांगणार तुम्हाला संसर्ग आहे की नाही श्वासनलिकेत एखादी गोष्ट अडकली किंवा अडथळा निर्माण झाला, की माणसाला खोकला येतो. त्या वेळी शरीर मेंदूला संदेश पाठवतं. त्या संदेशावर प्रतिक्रिया म्हणून मेंदू छाती आणि पोटाला संदेश पाठवतो आणि ती गोष्ट शरीराबाहेर फेकण्याचा आदेश देतो. जेव्हा आपण खोकतो, तेव्हा ती गोष्ट तोंडातून बाहेर येते. Hyfe Inc कंपनीतले टीबी तज्ज्ञ (TB Expert) डॉक्टर पीटर स्माल यांनी सांगितलं, की वेगवेगळ्या प्रकारच्या आजारात खोकण्याचा आवाज वेगवेगळा असतो. त्यात नेमका काय आणि कसा फरक असतो, हे ओळखण्याचं प्रशिक्षण अ‍ॅपला दिलं जात आहे. हे वाचा - आनंदाची बातमी! नाकाद्वारे देणाऱ्या नेजल व्हॅक्सिनची लवकरच क्लिनिकल ट्रायल या अ‍ॅपबद्दल अधिक माहिती देताना डॉ. पीटर स्माल म्हणाले, रुग्णाचा खोकला एकदा ऐकून त्याच्या आजाराचं निदान करणं डॉक्टर्सना शक्य होत नाही. त्यासाठी रुग्णांना अनेक चाचण्या कराव्या लागतात. त्यानंतरच आजाराचं नेमकं निदान करणं शक्य होतं. या अ‍ॅपमध्ये खोकण्याचे लाखो प्रकार फीड केले जातील. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप उघडून रुग्ण खोकला, की त्या आवाजाशी जुळणारा आवाज कोणत्या आजारातल्या खोकल्याचा आहे, हे अ‍ॅपद्वारे पाहिलं जाईल. त्यामुळे त्या रुग्णाला नेमका कोणता आजार झाला आहे, याचं अचूक निदान अ‍ॅपद्वारे लगेचच केलं जाईल.
First published: