मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुम्हालाही सतत चिंता, अस्वस्थता जाणवते का? मग नियमित व्यायाम करणं ठरेल खूप गुणकारी, वाचा सविस्तर

तुम्हालाही सतत चिंता, अस्वस्थता जाणवते का? मग नियमित व्यायाम करणं ठरेल खूप गुणकारी, वाचा सविस्तर

Anxiety symptoms Reduced by Exercise: धकाधकीच्या जीवनशैलीत ताणतणाव, अस्वस्थता किंवा सतत चिंता वाटण्याची समस्या अनेकांना होत आहे. पण, जर आपण नियमित व्यायाम (Regular exercise)  केला तर त्याची तीव्रता खूप कमी होऊ शकते.

Anxiety symptoms Reduced by Exercise: धकाधकीच्या जीवनशैलीत ताणतणाव, अस्वस्थता किंवा सतत चिंता वाटण्याची समस्या अनेकांना होत आहे. पण, जर आपण नियमित व्यायाम (Regular exercise) केला तर त्याची तीव्रता खूप कमी होऊ शकते.

Anxiety symptoms Reduced by Exercise: धकाधकीच्या जीवनशैलीत ताणतणाव, अस्वस्थता किंवा सतत चिंता वाटण्याची समस्या अनेकांना होत आहे. पण, जर आपण नियमित व्यायाम (Regular exercise) केला तर त्याची तीव्रता खूप कमी होऊ शकते.

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ताणतणाव, अस्वस्थता किंवा सतत चिंता वाटण्याची समस्या अनेकांना होत आहे. पण, जर आपण नियमित व्यायाम (Regular exercise)  केला तर त्याची तीव्रता खूप कमी होऊ शकते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, मध्यम आणि भरपूर व्यायामामुळे सतत चिंता वाटण्याचा त्रास कमी होऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे. जेव्हा तणाव अतिउच्च पातळीवर असतो तेव्हाही व्यायाम करण्याचे परिणाम जादूसारखे कार्य करतात. स्वीडनमधील गोथेनबर्ग विद्यापीठातील (University of Gothenburg) संशोधकांनी एका संशोधनात ही बाब सिद्ध झाली आहे. हे संशोधन 'जर्नल ऑफ अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स' (Journal of Affective Disorders)मध्ये प्रकाशित झालं आहे.

या संशोधनात 286 रुग्णांवर 'चिंता सिंड्रोम' (anxiety syndrome)चे संशोधन करण्यात आलं. गोटेनबर्ग आणि हॉलंड काउंटीच्या उत्तरेकडील भागात राहणारे हे सर्व लोक गेल्या 10 वर्षांपासून चिंतेने त्रस्त होते. त्यांचे गट बनवण्यात आले, यातील लोकांचे सरासरी वय 39 वर्षे असून त्यापैकी 70 टक्के महिला होत्या. पब्लिक हेल्थ रिकमेंडेशन्सद्वारे, 12 आठवड्यांसाठी काही गटांना विविध पद्धतीत (हलका, मध्यम, हार्ड) व्यायाम करण्यास सांगितले. काही गटांना भरपूर व्यायाम करण्यास सांगण्यात आलं.

हे वाचा - आहारात असा बदल करून प्रोस्टेट कॅन्सर धोका कमी केला जाऊ शकतो – New Research

संशोधनाचे परिणाम

व्यायाम करण्याचा परिणाम असा झाला की, यामुळे चिंता, अस्वस्थता आणि तणावाची लक्षणं अगोदरपेक्षा लक्षणीयरीत्या कमी झाली. अत्यंत तणावग्रस्त रूग्णांची स्थितीदेखील चांगली दिसून आली.

काही प्री-वर्कआउट सल्ले देखील अत्यंत तणावग्रस्त आणि नियंत्रित गटातील लोकांना देण्यात आले होते. उपचाराच्या 12 आठवड्यांत सहभागी रुग्णांमध्ये व्यायामानंतर लक्षणीय सकारात्मक फरक दिसून आले. जास्त ताणतणाव असलेल्या लोकांना किमान मध्यम स्तराचा व्यायाम करण्यास सांगितले होते.

हे वाचा - T20 World Cup : न्यूझीलंडच्या मिचलने मॅचच नाही मनही जिंकलं, अटीतटीच्या वेळी नाकारली रन, कारण…

नुकसान काय होतं?

चिंता हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही, पण त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. कारण चिंताग्रस्त अवस्थेत व्यक्तीची श्वास घेण्याची पद्धतही (Tendency to breathe) बदलते, त्यामुळे अस्वस्थता आणखी वाढते. न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठाच्या (University of Otago) संशोधकांनी त्यांच्या संशोधनाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Mental health