मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Baby bump सह फॅशन मॅगझिनवर झळकली अनुष्का शर्मा; Bold फोटोशूटच्या स्वतःच पडली प्रेमात

Baby bump सह फॅशन मॅगझिनवर झळकली अनुष्का शर्मा; Bold फोटोशूटच्या स्वतःच पडली प्रेमात

अनुष्का शर्माचा (anushka sharma) हा baby bump सह नवा फोटो पाहिला का?

अनुष्का शर्माचा (anushka sharma) हा baby bump सह नवा फोटो पाहिला का?

अनुष्का शर्माचा (anushka sharma) हा baby bump सह नवा फोटो पाहिला का?

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 30 डिसेंबर :  प्रेग्नंट अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) नुकतंच बोल्ड फोटोशूट (bold photoshoot) केलं आहे. एका फॅशन मॅगझिनच्या (fashion magazine) कव्हर पेजवर ती झळकली आहे. हा फोटो पाहून अनुष्काच त्याच्या प्रेमात पडली आहे. हा क्षण आपल्याला कायमचा जतन करायचा आहे, असं तिनं म्हटलं आहे. नव्या वर्षासाठी अनुष्कानं हे फोटोशूट केललं आहे. अनुष्कानं VOGUE INDIA साठी बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फॅशन आणि लाइफस्टाईल मॅगझिनच्या जानेवारी 2021 च्या एडिशनसाठी हे फोटोशूट आहे. ज्यामध्ये अनुष्का आपलं बेबी बंप दाखवताना दिसते आहे. बोल्ड लूकमध्ये ती दिसते आहे.
अनुष्काचा हा फोटो तिच्या चाहत्यांना तर आवडलाच आहे. पण ती स्वतःही या फोटोच्या प्रेमात पडली आहे. Capturing this for myself , for life ! असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे. हे वाचा - अखेर ती अफवाच; आलिया भट्टृ-रणबीर यांच्या लग्नाबद्दल काका रणधीरनी केला खुलासा भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) जानेवारी 2021 मध्ये आई-वडील होणार आहेत. सोशल मीडियावर ऑगस्टमध्ये या सेलिब्रिटीनं चाहत्यांना गूड न्यूज दिली होती. गर्भवती असताना लॉकडाऊनमध्येही अनुष्का शर्माने स्वत:ला फिट ठेवण्याचा आणि अॅक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. विराटही तिची पुरेपूर काळजी घेतो. काही दिवसांपूर्वीच विराट अनुष्काला शीर्षान करायला मदत करत असल्याचा फोटोही समोर आला होता. हे वाचा - 'सलमान खान म्हणजे देवदूत', रेमो डिसूझा यांनी भाईजानचे मानले आभार अनुष्का आपली प्रेग्नन्सी एन्जॉय करताना दिसते आहे. आता विराट आणि अनुष्कालाच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांनाही नव्या वर्षासह त्यांच्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची उत्सुकता आहे.
First published:

Tags: Anushka sharma, Bollywood actress, Virat kohli and anushka sharma

पुढील बातम्या