परिणीती चोप्राने सुशांतसह काम करायला दिला होता नकार; दिग्दर्शक अनुराग कश्यपचा खुलासा

परिणीती चोप्राने सुशांतसह काम करायला दिला होता नकार; दिग्दर्शक अनुराग कश्यपचा खुलासा

'हँसी तो फसी'मध्ये आपल्याला सुशांत सिंह राजपूतसह (sushant singh rajput) काम करायचं होतं, मात्र परिणीती चोप्राने (parineeti chopra) नकार दिला होता, असं दिग्दर्शक अनुराग कश्यपने (anuraag kashyap) सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात CBI, ED आणि NCB तपास करत आहेत. तसंच सुशांतबाबत अनेक जण वेगवेगळे खुलासे होत आहेत. बॉलिवूडमधील दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपने (anurga kashyap) सोमवारी सुशांतबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्राने (parineeti chopra) सुशांतसह काम करायला नकार दिला होता, असा खुलासा अनुराग कश्यपने केला आहे.

अनुराग कश्यप 'हँसी तो फसी' सिनेमा बनवत होता. त्यावेळी त्याने परिणीती चोप्राला या फिल्ममध्ये भूमिकेसाठी विचारलं. मात्र  या चित्रपटात जर माझ्यासोबत सुशांतसिंह राजपूत असेल तर मी सिनेमात काम करणार नाही, असं परिणीतीने सांगितल्याचं अनुराग म्हणाला. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनुरागने हा खुलासा केला.

अनुराग कश्यपने सांगितलं की, "हँसी तो फसी या फिल्ममध्ये परिणिती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. मात्र सिद्धार्थ मल्होत्राच्या आधी सुशांतसिंह राजपूतला भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं.  मात्र परिणीतीने आपण टीव्ही कलाकारांसोबत  काम करणार नाही असं सांगितलं. त्यामुळे सुशांतचं नाव मागे पडलं होतं"

हे वाचा - बहिणीच्या नवऱ्यासह सुशांतचे Whatsapp chat समोर; या मुद्द्यांवर झाली होती चर्चा

"आपण सुशांत सिंहलादेखील दोन सिनेमे ऑफर केले होते. मात्र आपल्याबरोबर काम करण्याऐवजी यशराज फिल्मस या मोठ्या बॅनरसोबत काम करायला त्याने प्राधान्य दिलं होतं. सुशांत आणि परिणिती यांनी 'शुद्ध देसी रोमान्स' या यशराजच्या सिनेमात एकत्र काम देखील केलं होतं", असं अनुराग कश्यपने सांगितलं.

हे वाचा - सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश, 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

याआधी अनुरागने सुशांत सिंहच्या मॅनेजरबरोबर झालेल्या whatsapp चॅटचे स्क्रिनशॉट देखील शेअर केले होते. यामध्ये त्याने म्हटलं की, "मला सुशांतबरोबर काम करण्याची इच्छा होती. मात्र काही कारणांमुळे हे शक्य झालं नाही", असं म्हणत त्याने सुशांतच्या मॅनेजरसह झालेले whatsapp चॅटही  त्याने शेअर केलं होतं.

Published by: Priya Lad
First published: September 21, 2020, 7:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading