Antibiotic चा अति डोस ठरतोय घातक; नष्ट होण्याऐवजी अधिकच मजबूत होत आहेत बॅक्टेरिया

Antibiotic चा अति डोस ठरतोय घातक; नष्ट होण्याऐवजी अधिकच मजबूत होत आहेत बॅक्टेरिया

ड्रग रेझिस्टन्सला (Drug Resistance) प्रत्युत्तर म्हणून अँटीबायोटिकचा (Antibiotic) डोस वाढवला गेला, तर तो बॅक्टेरियाला अधिक कणखर होण्यास मदत करतो.

  • Share this:

मुंबई, 14 मे : कोविड 19 (Covid 19) महासाथीच्या काळात माणसाच्या प्रतिकार शक्तीत वाढ करण्यावर भर दिला जात आहे. तसंच अँटीबायोटिक्सचा (Antibiotic) वापरही या काळात वाढला आहे. त्यामुळे अँटीबायोटिक्सचे फायदे-तोटे यावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. अजूनतरी कोविड-19 वर प्रभावी उपचार दृष्टिपथात न आल्यामुळे अँटीबायोटिक्सवर लोक अवलंबून आहेत. अँटीबायोटिक्स बराच काळ घेतली गेली, तर त्यांचा बॅक्टेरियावर पडणारा प्रभाव कमी होतो. या पार्श्वभूमीवर अँटीबायोटिक्सचा डोस वाढवण्याचे फायदे-तोटे यावर प्रकाश टाकणारं एक संशोधन नुकतंच करण्यात आलं.

अलिकडेच झालेल्या या संशोधनात असं दिसून आलं आहे की, ड्रग रेझिस्टन्सला (Drug Resistance) प्रत्युत्तर म्हणून अँटीबायोटिकचा डोस वाढवला गेला, तर तो बॅक्टेरियाला अधिक कणखर होण्यास मदत करतो. ड्रग रेझिस्टन्स अर्थात औषधाला दाद न देण्याची क्षमता बॅक्टेरियासारख्या सूक्ष्मजीवांमध्ये विकसित होण्याची समस्या जागतिक पातळीवरची गंभीर समस्या असल्याचं संयुक्त राष्ट्रांनीही म्हटलं आहे. या समस्येमुळे 2050 पर्यंत एक कोटी जणांचा मृत्यू होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

हे वाचा - कोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात? वैज्ञानिकांनी सांगितलं उत्तर

याआधीच्या संशोधनात असं आढळलं होतं, बॅक्टेरिया ड्रग रेझिस्टंट होऊ नये म्हणून अँटीबायोटिक औषधाचा डोस वाढवला, तर त्याची औषधाला प्रतिकार करण्याची शक्ती आणि गती मंदावता येऊ शकते. मात्र सूक्ष्मजीवांच्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा काय परिणाम होईल, याचा विचार मात्र त्या संशोधनात करण्यात आला नव्हता. त्यानंतर अलिकडे ब्रिटन आणि युरोपातल्या संशोधकांनी ई कोलाय (E Coli) नावाच्या बॅक्टेरियावर तीन सर्वसाधारण अँटीबायोटिक्सचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला. अँटीबायोटिक्सचा डोस वाढवल्यामुळे बॅक्टेरियाकडून होणाऱ्या प्रतिकाराची गती आणि क्षमता मंदावली. मात्र त्याच्या जीवनावर त्याच्या चांगला परिणाम झाला आणि त्याचा प्रजननदरही वाढला. रॉयल सोसायटी बायोलॉजी लॅटर्स या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

'युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर्स स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस'चे संशोधक माटोलॅगेटर यांनी एएफपीला सांगितलं, 'वेगाने वाढणारा स्ट्रेन कमी वेळात जास्तीत जास्त लोकसंख्येत पसरतो. त्यामुळे बॅक्टेरियाचा वृद्धी दर हे त्याच्या चांगल्या आरोग्याचं लक्षण असल्याचं आम्ही मानतो.'

हे वाचा - कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास पहिला डोस पुन्हा घ्यायचा का?

अँटीबायोटिक्सचा जादा डोस समस्या निर्माण करत असून त्यामुळे जास्त क्षमतेचे बॅक्टेरिया विकसित होऊ शकतात. नव्याने विकसित होत असलेल्या स्ट्रेन्सचं आरोग्य चांगलं असणं हा या समस्येचा नवा आयाम आहे. लॅगेटर म्हणतात, 'नवी औषधं विकसित करताना ती संसर्गापासून किती प्रभावी पद्धतीने मुक्ती देऊ शकतात, हे पाहिलं जातं. मात्र ज्या बॅक्टेरियांना लक्ष्य करण्यासाठी हे औषध विकसित केलं जातं, त्यांच्याबद्दल रेझिस्टन्स तयार होण्याबरोबरच त्यांच्यापासून नव्या, तंदुरुस्त स्ट्रेन्स विकसित होऊ शकतील, या शक्यतेवर फारसं लक्ष दिलं जात नाही.'

First published: May 14, 2021, 10:46 PM IST

ताज्या बातम्या