व्हॅलेंटाइन वीक नंतर आता Anti-Valentine week, नेमका काय असतो हा Week?

व्हॅलेंटाइन वीक नंतर आता Anti-Valentine week, नेमका काय असतो हा Week?

व्हॅलेंटाइन वीकनंतर अँटी-व्हॅलेंटाइन वीक ( Anti-Valentine Week) साजरा केला जातो. ह्या अॅन्टी व्हॅलेंटाइन डेची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : 14 फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. मात्र 14 फेब्रुवारी आधी 6 दिवस वेगवेगळे डे साजरे केले जातात. खऱ्या अर्थाने 7 फेब्रुवारीपासून प्रेमाचा आठवडा सुरू होतो.या प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात झाली ती प्रेमाचं प्रतिक मानल्या जाणाऱ्या गुलाबाच्या फुलाने. 7 फेब्रुवारीला Rose day साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रेमाची कबुली देण्याचा दिवस म्हणजेच Propose day. त्यानंतर प्रेमाची गोड सुरुवात करण्याचा दिवस म्हणजेच Chocolate day. त्यानंतर प्रेमाची भेट देण्याचा दिवस teddy day. त्यानंतर आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन देण्याचा दिवस Promise day. मग प्रेमाची ऊब अनुभवणारा दिवस म्हणजे Hug day. त्यानंतर प्रेमाची गोड भेट म्हणून साजरा केला जाणारा Kiss day आणि 14 फेब्रुवारीला साजरा केला जाणारा Valentine’s day.

ब्रेकअपचे साईड इफेक्ट्स, गर्लफ्रेंडने दिला बॉयफ्रेंडला चोप

बरं आता हा प्रेमाचा आठवडा 14 फेब्रुवारीला संपत असला तरी 15 फेब्रुवारीपासून सुरू होतो तो म्हणजे Anti-Valentine Day. हा Anti-Valentine day 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी असा साजरा केला जातो. असं म्हणतात या आठवडा प्रेम न करणाऱ्यांसाठी असतो. कारण या आठवड्यात साजरे केले जाणारे दिवस भन्नाट असतात. सर्वात पहिला म्हणजे Slap day जो 15 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 16 फेब्रुवारीला Kick day साजरा केला जातो. 17 फेब्रुवारीला Perfume day, 18 फेब्रुवारीला Flirting day साजरा केला जातो. तर 19 फेब्रुवारीला Confession day म्हणजेच एकमेकाला गोष्टी कन्फेस करण्याचा हा दिवस असतो. 20 फेब्रुवारीला Missing day आणि Anti-Valentine Week मधला शेवटचा दिवस म्हणजे Breakup day.

अखेर चीनला Coronavirus वर इलाज मिळाला, काय आहे सत्य?

व्हॅलेंटाइन डे जितका देशभरात साजरा केला जातो. आता तितकीच अँटी व्हॅलेंटाइन वीकचीही क्रेझ वाढत चालली आहे.व्हॅलेंटाइन वीक प्रमाणेच तरुणाई आजकाल हा अँटी व्हॅलेंटाइन वीक साजरा करायला लागलेय.

First published: February 15, 2020, 10:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading