पेशींना सुरक्षा देतात अँटीऑक्सिडंट; म्हणून आहारात समाविष्ट करा 5 पदार्थ

पेशींना सुरक्षा देतात अँटीऑक्सिडंट; म्हणून आहारात समाविष्ट करा 5 पदार्थ

अँटीऑक्सिडंट शरीरातील पेशींच्या जवळ जमा होणाऱ्या मुक्त कणांना नियंत्रित करतात.

  • Last Updated: Aug 25, 2020 08:42 PM IST
  • Share this:

अँटीऑक्सिडंट पेशींना खराब होण्यापासून वाचवतात. शरीरात आपले अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील मुक्त कणांना नियंत्रित करतात. मुक्त कण पेशींच्या जवळ जमा होतात, ह्या प्रक्रियेने अनेक रोग होतात, पण अँटीऑक्सिडंट घेतल्याने हे मुक्त कण एका जागी जमा होऊ शकत नाहीत. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, खाद्य पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट नैसर्गिकरित्या असतात. ते विशेषतः फळं, भाज्या यांच्यातून मिळतात. अनेक जीवनसत्वं जसं ई आणि सी हेदेखील प्रभावी अँटीऑक्सिडंट्स आहेत.

मुक्त कण सतत शरीरात बनत असतात. अँटीऑक्सिडंट शिवाय मुक्त कण खूप गंभीर नुकसान करू शकतात अगदी व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. तसं पाहिलं तर हे मुक्त कण काही महत्वपूर्ण कार्यदेखील करतात जे शरीराच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असतात. जसं रोग प्रतिकारक पेशी संसर्गाशी लढताना मुक्त कणांचा वापर करतात. म्हणून शरीरातील मुक्त कण आणि अँटीऑक्सिडंट यांच्यात संतुलन असणं आवश्यक आहे. जेव्हा मुक्त कण, अँटीऑक्सिडंटपेक्षा जास्त होतात ते ऑक्सिडेटिव्ह तणावाची स्थिती निर्माण करतात. जर ही परिस्थिती दीर्घकाळ राहिली तर डीएनए आणि शरीरातील महत्वपूर्ण अणूंचं नुकसान होऊ शकतं. कधी कधी ते मृत्यूचे कारण देखील होतं. डीएनएला नुकसान झालं तर कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

हे वाचा - हातापायात कमजोरी, मुंग्या येणं पोटॅशियमची कमतरता; दुर्लक्षामुळे बळातील अनेक आजार

जीवनशैली, तणाव आणि वातावरणातील कारकांमुळे मुक्त कण आणि ऑक्सिडेट तणाव वाढू शकतो, त्यात वायू प्रदूषण, सिगारेटचा धूर, इतर धूर, विषारी द्रव्ये, उच्च रक्त शर्करा, जीवाणू, बुरशी, विषाणू यांचं संक्रमण, दारूचं सेवन, लोह, मॅग्नेशियम, कॉपर किंवा झिंकचं अधिक सेवन, अँटीऑक्सिडंटची कमतरता इत्यादी सामील आहेत. म्हणून अँटीऑक्सिडंट अत्यंत महत्वपूर्ण आहेत.

शरीर स्वतःचं अँटीऑक्सिडंट जसं सेल्युलर अँटीऑक्सिडंट ग्लुटाथियोन बनवतं, पण खाद्य पदार्थांमधूनदेखील अँटीऑक्सिडंट मिळवता येतात. अँटीऑक्सिडंट भरपूर आहार घेतला तर ते शरीरातील विषारी तत्वांना बाहेर टाकण्याचं काम करतं. म्हणूनच अँटीऑक्सिडंट युक्त आहार रोजच्या जेवणात असायला हवा.

हे वाचा - फक्त कानांना मालिश करून अनेक शारीरिक वेदना आणि तणावांपासून मिळेल मुक्ती

जाणून घेऊ 5 खाद्यपदार्थ जे अँटीऑक्सिडंटने युक्त आहेत :

टोमॅटो : टोमॅटो अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण असे आहेत. त्यातील अँटीऑक्सिडंटने हृदय रोग होण्याची शक्यता 30 टक्के कमी होते. त्यात जीवनसत्त्वं ए, सी आणि अधिक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट ल्युकोपेन असतं.

बीट : बिटामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. त्याने त्वचा चमकदार आणि सुंदर होते. याच्या सेवनाने रक्त स्वच्छ होतं आणि लाल रक्तपेशी वाढतात.

आलं : अनेक अभ्यासात असं दिसून आलं आहे की आल्यामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात. ते शरीराचं लिपिड पेरोक्सिडेशन आणि डीएनएला हानी पोहोचण्यापासून रोखतात. अँटीऑक्सिडंटयुक्त आलं कॅन्सर, मधुमेह, संधिवात अशा अनेक आजारांपासून वाचवतं.

लसूण : लसणामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट तत्व आहेत, जसं जीवनसत्व ए, बी आणि सी हे योग्य प्रमाणात असतात. यात असे अनेक गुण आहेत्त ज्याने शरीर स्वस्थ राखण्यात आणि आजारांना दूर ठेवण्यात मदत होते.

डाळिंब : डाळिंब हे अँटीऑक्सिडंटचं एक उत्तम स्रोत आहे. याने शरीरातील लाल रक्त पेशी वाढतात आणि पांढऱ्या रक्त पेशी मजबूत होतात. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्याने ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात.

अधिकमाहिती साठी वाचा आमचा लेख - निरोगी राहण्याच्या टिप्स

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 25, 2020, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading