• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • चेहरा चिरतरुण दिसण्यासाठी हळदीचा असा करा उपयोग; 2 आठवड्यात दिसेल फरक

चेहरा चिरतरुण दिसण्यासाठी हळदीचा असा करा उपयोग; 2 आठवड्यात दिसेल फरक

Anti Aging Skin Care Tips :हळदीमध्ये अँटीबॅक्टीरियल (जीवाणूविरोधी), अँटी-इंफ्लेमेटरी (जळजळ होण्यापासून रोखणं) आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात, जे त्वचेवर पुरळ, खाज सुटणं, कोरडेपणा, मुरुम आदी होण्यापासून रोखतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : हळदीमध्ये (Turmeric) अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोबायोटिक्स भरपूर असतात. ते चिरतारुण्य राखण्यात मदत करतात आणि शारीरिकदृष्ट्या वृद्धत्व जाणवण्यापासून दूर नेण्यास मदत करतात. तसंच, त्वचा चमकदार आणि निरोगी होण्यासही याची मदत होते. हळदीमध्ये अँटीबॅक्टीरियल (जीवाणूविरोधी), अँटी-इंफ्लेमेटरी (जळजळ होण्यापासून रोखणं) आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात, जे त्वचेवर पुरळ, खाज सुटणं, कोरडेपणा, मुरुम आदी होण्यापासून रोखतात. चेहऱ्यावर वृद्धत्वाची (Anti Aging) चिन्हं दिसू लागली असतील तर, काही वस्तू हळदीमध्ये मिसळून घेतल्यास आठवडाभरातच तुमची त्वचा तजेलदार आणि तरुण दिसेल. यामुळं तुमची त्वचा गुळगुळीत होईल आणि निरोगी त्वचेसह विविध त्रासांपासून मुक्तता मिळेल. वृद्धत्व दूर करण्यासाठी तुम्ही हळदीचा फेस पॅक कसा बनवू शकता, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असा बनवा फेस पॅक साहित्य अर्धा चमचा हळद, एक चमचा मध आणि थोडं दूध. अशा प्रकारे चेहऱ्यावर लावा या सर्व वस्तू एका वाडग्यात घेऊन नीट मिक्स करा. आता हे मिश्रण चेहरा स्वच्छ धुवून त्यावर लावा. 10-15 मिनिटांनंतर पाण्याने धुवून स्वच्छ करा. हे तुम्ही आठवड्यातून दोन दिवस करू शकता. हे ठरेल फायदेशीर हळद हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी खूप चांगले असतात. याच्या वापराने पिंपल्स, फ्रिकल्स, सुरकुत्या, मुरुम, स्ट्रेच मार्क्स, तेलकट त्वचेपासून सुटका होते आणि त्वचा चमकदार दिसते. हे वाचा - रेल्वे बांधतेय दोन ट्रॅकवाले बोगदे, खालून ट्रेन तर वरून जाणार वन्य प्राणी; पाहा PHOTOs मध मधामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. त्यात जीवाणूंच्या (बॅक्टेरिया - bacteria) वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे त्वचेची पीएच पातळी संतुलित करतात. तसंच मुरुम आणि इतर त्वचाविकार दूर ठेवतात. हे वाचा - Muhurat Trading 2021 : मुहूर्त ट्रेडिंगमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी तासाभरात कमावले 101 कोटी! दूध दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, डी, बी6, बी12, बायोटिन, कॅल्शियम, प्रथिनं आदी त्वचेला निरोगी ठेवण्याचं आणि मृत त्वचा काढून टाकण्याचं काम करतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याती हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: