मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गर्भपात रोखण्यासाठी घेणारं औषध बाळावर करतो दुष्परिणाम, वाढतो कॅन्सरचा धोका

गर्भपात रोखण्यासाठी घेणारं औषध बाळावर करतो दुष्परिणाम, वाढतो कॅन्सरचा धोका

गर्भावस्थेदरम्यान पोटाचा आकार वाढवण्यासाठी, तसंच प्रारंभिक संकुचन थांबवण्यासाठी प्रोजेस्टेरॉन (Progesteron) मदत करते. संकुचनामुळेच गर्भपाताचा धोका वाढत असतो.

गर्भावस्थेदरम्यान पोटाचा आकार वाढवण्यासाठी, तसंच प्रारंभिक संकुचन थांबवण्यासाठी प्रोजेस्टेरॉन (Progesteron) मदत करते. संकुचनामुळेच गर्भपाताचा धोका वाढत असतो.

गर्भावस्थेदरम्यान पोटाचा आकार वाढवण्यासाठी, तसंच प्रारंभिक संकुचन थांबवण्यासाठी प्रोजेस्टेरॉन (Progesteron) मदत करते. संकुचनामुळेच गर्भपाताचा धोका वाढत असतो.

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: औषधांच्या साइड इफेक्ट्सबद्दल (Side Effects of Medicines) अनेकांच्या मनात कायमच शंका असतात. कारण नियमित वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधांचे कित्येक साइड इफेक्ट्स असतात आणि ते दीर्घ काळ जाणवतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं न घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. औषधांच्या साइड इफेक्ट्सबद्दल अमेरिकेतल्या ह्यूस्टनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास हेल्थ सायन्स सेंटरमधल्या (University of Texas Health Science Centre) शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं आहे. गर्भपात (Anti Abortion) किंवा वेळेआधी होणारी प्रसूती रोखण्यासाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या एका औषधाचे गर्भाशयावर विपरीत परिणाम होत असल्याचं त्या संशोधनात आढळून आलं आहे. त्यामुळे नंतर होणाऱ्या मुलांना सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत कॅन्सर होण्याचा धोका दुपटीपेक्षा जास्त असतो, असं लक्षात आलं आहे. अमेरिकन जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी या जर्नलमध्ये या संशोधनाचा निष्कर्ष प्रकाशित करण्यात आला आहे. 17-ओएचपीसी (17-OHPC) असं त्या औषधाचं नाव असून, ते एक सिंथेटिक प्रोजेस्टोजेन (Synthetic Progestogen) आहे. गेल्या शतकाच्या मध्यपासून आतापर्यंतच्या काळात हे औषध वेळेआधी होणारी प्रसूती रोखण्यासाठी वापरलं जात आहे.

गर्भावस्थेदरम्यान पोटाचा आकार वाढवण्यासाठी, तसंच प्रारंभिक संकुचन थांबवण्यासाठी प्रोजेस्टेरॉन (Progesteron) मदत करते. संकुचनामुळेच गर्भपाताचा धोका वाढत असतो.

हेही वाचा-  सर्दी-पडसं दूर होऊन मूडही होईल फ्रेश; हिवाळ्यात Black Coffee पिण्याचे इतके आहेत फायदे

 तज्ज्ञ म्हणतात...

या संशोधनाच्या लेखिका कॅटलीन सी. मर्फी (Caitlin C. Murphy) यांनी सांगितलं, की ज्या महिलांनी गर्भारपणात हे औषध घेतलं होतं, त्या महिलांच्या मुलांमध्ये हे औषध न घेणाऱ्या महिलांच्या मुलांच्या तुलनेत कॅन्सर होण्याचा धोका दुप्पट आहे. 1960च्या दशकात किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींमध्ये कोलोरेक्टल अर्थात आतडी आणि मलाशयाचा कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर (Pancreas Cancer) यांसह अन्य अनेक आजार होण्याचं प्रमाण वेगानं वाढलं. त्याचं ठोस कारण कोणालाच माहिती नव्हतं.

त्या पार्श्वभूमीवर हे संशोधन करण्यात आलं. जून 1959 ते जून 1967 या कालावधीत एका योजनेअंतर्गत ज्या महिलांनी प्रसूतीपूर्व देखभाल सेवा घेतली होती, त्यांच्या माहितीचं विश्लेषण या संशोधनात करण्यात आलं. तसंच, कॅलिफोर्निया कॅन्सर रजिस्ट्रीमधल्या माहितीचं विश्लेषणही करण्यात आलं. त्या रजिस्ट्रीमध्ये बालकांच्या कॅन्सरची नोंदणी केलेली असते.

हेही वाचा-  रहस्यमय गाव! इथले बहुतेक सगळेच नागरिक ठेंगणे; 3 फुटांहून अधिक नाही उंची

 या संशोधनातून असं आढळलं, की जिवंत जन्मलेल्या 18,751 बाळांमध्ये 1008 जणांना 58व्या वर्षापर्यंत कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्यापैकी 234 व्यक्ती अशा होत्या, की त्यांच्या आईने प्रेग्नन्सीदरम्यान 17-ओएचपीसी हे औषध घेतलं होतं. ज्यांचा आईच्या गर्भात असताना या औषधाशी संपर्क आला होता, त्यांपैकी वय वाढल्यानंतर कॅन्सर होणाऱ्या व्यक्तींची संख्या दुप्पट होती. त्यापैकी 65 टक्के व्यक्तींना 50 वर्षांपेक्षा कमी वयातच कॅन्सर झाल्याचं आढळून आलं.

कॅटलीन सी. मर्फी यांनी सांगितलं, की गर्भारपणात हे औषध घेतलं असेल, तर बालकांच्या प्राथमिक विकासावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे प्रौढावस्थेत त्यांना कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, असा निष्कर्ष संशोधनातून निघाला आहे. या अभ्यासात सिंथेटिक हॉर्मोनचा परिणामही पाहायला मिळाल्याचं मर्फी यांनी सांगितलं. गर्भावस्थेत असताना बालकावर जी प्रतिक्रिया किंवा प्रक्रिया होते, त्याचा परिणाम काही दशकांनंतर कॅन्सरच्या असलेल्या धोक्याच्या रूपात पाहायला मिळतो. एवढंच नव्हे, तर सरप्राइज ट्रायलमध्ये असंही दिसून आलं, की 17-ओएचपीसी या औषधाचा प्रत्यक्षात काहीही उपयोग होत नाही. म्हणजेच वेळेआधी प्रसूती होण्याचा धोका या औषधाच्या वापराने कमी होत नाही, असं संशोधनात आढळलं आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (US-FDA) ऑक्टोबर 2020 मध्ये हे औषध बाजारातून मागे घेण्याचा प्रस्ताव दिला.

First published:

Tags: Pregnancy