मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अजबच! पासपोर्ट, व्हिसा नाही तर इथं राहण्यासाठी चक्क काढून टाकावा लागतो शरीरातील एक अवयव

अजबच! पासपोर्ट, व्हिसा नाही तर इथं राहण्यासाठी चक्क काढून टाकावा लागतो शरीरातील एक अवयव

ही विचित्र अट फक्त मोठ्या माणसांना नव्हे, तर लहान मुलांसाठीही बंधनकारक आहे.

ही विचित्र अट फक्त मोठ्या माणसांना नव्हे, तर लहान मुलांसाठीही बंधनकारक आहे.

ही विचित्र अट फक्त मोठ्या माणसांना नव्हे, तर लहान मुलांसाठीही बंधनकारक आहे.

  व्हिलास लास एस्ट्रेलास, 04 एप्रिल : प्रत्येक देशात किंवा प्रांतात राहण्याचे काही नियम असतात. काही ठिकाणी पासपोर्ट, व्हिसा असणं बंधनकारक असतं, तर काही ठिकाणी फक्त एखादी कायदेशीर अट पूर्ण करावी लागते. त्याचप्रमाणे या पृथ्वीवर एक ठिकाण असं आहे, जिथं राहण्यासाठी तुम्हाला चक्क तुमच्या शरीराचा एखादा अवयव काढून टाकावा आहे. हा विचित्र नियम केवळ मोठ्या माणसांना नव्हे, तर लहान मुलांनाही पाळणं बंधनकारक आहे. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.

  अंटार्क्टिकातील (Antarctica) व्हिलास लास एस्ट्रेलास (Villas Las Estrellas) या गावात ज्यांना दीर्घ काळ राहायचं असेल, त्यांना त्यांचं अॅपेंडिक्स (Appendix) अर्थात आंत्रपुच्छ हा अवयव शस्त्रक्रिया करून काढून टाकणं बंधनकारक आहे.

  अॅपेंडिक्स म्हणजे आतड्याच्या टोकाकडचा भाग. त्याला मराठी आंत्रपुच्छ असं म्हणतात. त्याचं एक टोक बंद, तर तर एक टोक खुलं असतं. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवी शरीरात झालेल्या बदलांनंतर या अवयवाचं काही काम उरलेलं नाही. त्यामुळे तो शरीरातला अनावश्यक अवयव मानला जातो. अनेकदा अन्नातला एखादा कण त्यात अडकतो आणि कुजू लागतो. त्यानंतर त्या अवयवाला संसर्ग होतो. तो संसर्ग जास्त दिवस राहिला, तर अॅपेंडिक्स फुटू शकतं आणि त्यातून जीव जाऊ शकतो. त्यामुळेच व्हिलास लास एस्ट्रेलास या गावात राहण्याआधी अपेंडिक्स काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करावी लागते.

  हे वाचा - आश्चर्य! 3 Penises सह जन्माला आलं बाळ; पाहून डॉक्टरही झाले हैराण

  या गावाची लोकसंख्या साधारण 100 आहे. तिथलं सर्वांत जवळचं हॉस्पिटलही किंग जॉर्ज आयलंडमध्ये सुमारे एक हजार किलोमीटर अंतरावर आहे. तिथं पोहोचण्यासाठी बर्फाच्छादित डोंगर आणि अत्यंत भयानक रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो. एवढं करून तिथे गेलं, तरी तिथे मोजकेच डॉक्टर्स आहेत आणि त्यापैकी कोणीही सर्जन नाही. अचानक कोणाला अपेंडिक्सचं दुखणं सुरू झालं, तर थेट जीवच जाण्याची भीती असते. अशी एक-दोन उदाहरणं इथं घडलेली आहेत.

  त्यामुळेच अॅपेंडिक्स हा शरीराचा अनावश्यक अवयव असल्याचं मानून ते काढून टाकण्यावर इथं भर दिला जातो. या गावात चिली (Chile) देशाच्या सैन्याचा तळ (Military Base) आहे. तसंच वैज्ञानिक आणि डॉक्टर आळीपाळीने इथं येऊन राहत असतात. अनेकदा त्यांना बऱ्याच कालावधीसाठी इथं राहावं लागतं, तेव्हा त्यांचं कुटुंबीयही इथं येऊन वास्तव्य करतात. तिथं येणारे लोक पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री केली जाते, जेणेकरून कोणत्याही प्रकारची वैद्यकीय आणीबाणीची स्थिती उद्भवू नये.

  आई होणं जीवघेणं

  या गावात वास्तव्य करायचं असल्यास आणखी एक अट आहे. त्याबद्दल कोणतेही लेखी आदेश नाहीत; पण तरीही ती पाळावी लागते. कुटुंबासहित तिथे राहणारे शास्त्रज्ञ, सैनिक यांना सल्ला दिला जातो, की त्यांच्या पत्नी किंवा कुटुंबातल्या कोणीही स्त्रिया गर्भवती होऊ नयेत. कारण वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे इथे आई बनणंही जीवघेणं ठरू शकतं. त्या गावात राहणाऱ्या बहुतांश व्यक्ती शास्त्रज्ञ किंवा त्यांच्या कुटुंबातल्या असतात. चिलीचं हवाई दल किंवा नौदलातले अधिकारीही तिथे तैनात असतात. काही आठवडे किंवा महिन्यांऐवजी ते काही वर्षंही तिथे राहतात. तिथे जाण्यापूर्वी ते अपेंडिक्स काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करतात, जेणेकरून कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवू नये.

  हे वाचा - सॅल्युट! आगीत हॉस्पिटल पेटलं तरी डॉक्टर करत राहिले रुग्णाची सर्जरी; पाहा VIDEO

  किराणा सामानाची दुकानं, फळं-भाजीपाल्याची दुकानं, बँका, शाळा, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सगळ्या सुविधा या गावात आहेत. तरीही इथे केवळ प्राथमिक शिक्षणाचीच सोय आहे. हॉस्पिटल्स फारशी सुसज्ज नसून, केवळ किरकोळ आजारांवर किंवा जखमांवरच उपचार होऊ शकतात. अशा स्थितीमुळे तिथे कोणीही डॉक्टर कायमस्वरूपी किंवा जास्त काळासाठी राहायला तयार होत नाही.

  त्या गावात लोकसंख्येची बजबजपुरी नाही. वर्षभर ते बर्फाच्छादित असतं. इकडेतिकडे प्रवासासाठी ट्रक किंवा राफ्टिंग बोट वापरल्या जातात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तिथे उपलब्ध नाही. त्या गावातलं तापमान उणे 2.3 अंश सेल्सिअस असतं. अंटार्क्टिकाचा विचार करता, ते सर्वांत उष्ण मानलं जाऊ शकतं. वर्षभर इतक्या थंड वातावरणात राहणं हे एक आव्हानच असतं. तिथे वास्तव्य करणाऱ्या व्यक्ती आपली घरं जास्तीत जास्त सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. तिथल्या इमारतींमध्ये सुंदर फोटो असतात. साधारणतः हे फोटो शास्त्रज्ञ किंवा सैनिकाचे असतात.

  First published:

  Tags: World news