मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अंटार्क्टिकामधले मासे तापमानातल्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी वर्तनात करतायत धक्कादायक बदल

अंटार्क्टिकामधले मासे तापमानातल्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी वर्तनात करतायत धक्कादायक बदल

पृथ्वीवरच्या सात खंडांपैकी सर्वांत दक्षिणेला असलेल्या अंटार्क्टिका खंडावरच्या (Antarctica continent) जलचरसृष्टीतल्या बदलाकडे संशोधकांनी लक्ष वेधलं आहे.

पृथ्वीवरच्या सात खंडांपैकी सर्वांत दक्षिणेला असलेल्या अंटार्क्टिका खंडावरच्या (Antarctica continent) जलचरसृष्टीतल्या बदलाकडे संशोधकांनी लक्ष वेधलं आहे.

पृथ्वीवरच्या सात खंडांपैकी सर्वांत दक्षिणेला असलेल्या अंटार्क्टिका खंडावरच्या (Antarctica continent) जलचरसृष्टीतल्या बदलाकडे संशोधकांनी लक्ष वेधलं आहे.

  मुंबई, 1 डिसेंबर : जगभरात सतत हवामानबदलाची चर्चा सुरू असते. याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत अनेक देश चर्चा करतात. त्याच्या अंमलबजावणीसाठी पावलं टाकली जात आहेत. या पार्श्वभूमीवर पृथ्वीवरच्या सात खंडांपैकी सर्वांत दक्षिणेला असलेल्या अंटार्क्टिका खंडावरच्या (Antarctica continent) जलचरसृष्टीतल्या बदलाकडे संशोधकांनी लक्ष वेधलं आहे. 'नेचर वर्ल्ड न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  पृथ्वीचा दक्षिण ध्रुव असलेला हा खंड 98 टक्के बर्फाच्छादित असून, तिथे प्रचंड वादळी वारे आणि अत्यंत तीव्र तापमान असते. त्यामुळे तिथे कायमस्वरूपी मानवी वस्ती नाही. तसंच जीवसृष्टीही मर्यादित आहे. तिथे बर्फाळ भूपृष्ठावर कधीकधी सील, सीगल्स, (seals and seagulls), पेंग्विन्स हे प्राणी दिसतात; मात्र हा खंड दक्षिण महासागराने वेढला गेला असून, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर म्हणतात. हा दक्षिणी महासागर (Southern Ocean) मात्र अद्भुत जलचर सृष्टीनं भरलेला आहे. या समुद्रात एकपेशीय वनस्पती, सायनोबॅक्टेरियाचे ज्वलंत भाग, क्रिल आणि क्रस्टाशियन्स, केल्पची जंगलं, ध्रुवीय अस्वलं, समुद्रातले कोळी, व्हेल पॉड्स आणि अंटार्क्टिक मासे आहेत. हे मासे दक्षिणी महासागरातल्या 9000 ज्ञात सागरी प्रजातींच्या अन्नसाखळीचा एक अविभाज्य घटक आहेत. तरीही त्यांचं सब-झिरो अभयारण्य धोक्यात येऊ शकतं, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

  2021मधल्या हवामान अहवालानुसार अंटार्क्टिका खंडाचं तापमान 2050पर्यंत किमान 1 अंश सेल्सिअसने वाढलेलं असेल. या पार्श्वभूमीवर व्हर्जिनिया टेकच्या फ्रॅलिन बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (Virginia Tech's Fralin Biomedical Research Institute) संशोधकांनी अंटार्क्टिक माशांच्या दोन प्रजाती तीव्र उष्णतेच्या स्थितीला (Heat stress) कसा प्रतिसाद देतात याबाबत संशोधन केलं. यामध्ये त्यांनी रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिन असलेली एक प्रजाती आणि दुसरी हिमोग्लोबिन नसलेली प्रजाती निवडली. PLOS ONE मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

  माशांच्या या दोन्ही प्रजातींनी तापमानवाढीला आपल्या वर्तनातल्या बदलानं (Behavioral Changes) प्रतिसाद दिला. ज्यामध्ये सतत कल्ले हलवणं, पृष्ठभागावर जाऊन श्वास घेणं, हालचालीत बदल करणं असे अनेक आश्चर्यकारक बदल दिसून आल्याचं फ्रॅलिन बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक मायकेल फ्रीडलँडर (Michael Friedlander) यांच्या नेतृत्वाखालच्या व्हर्जिनिया टेक व्हाइस या संशोधन पथकाने म्हटलं आहे.

  'या तापमान वाढीमुळे अंटार्क्टिक माशांमध्ये (Antarctic fishes) चयापचय क्रियेचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं असून, त्यासाठी त्यांनी आपल्या विशिष्ट हालचाली वाढवल्याचं, तसंच श्वासोच्छ्वासाचा वेग वाढवल्याचं आढळलं. पर्यावरणीय बदलांना सामोरं जाण्यासाठी या जीवांनी आपल्या वर्तनात लवचिकता आणल्याचं यामुळे स्पष्ट झालं आहे,' असं फ्रीडलँडर यांनी सांगितलं. 'मज्जासंस्थेचं वाढलेलं तापमान, हृदयाच्या स्नायूंसह अन्य स्नायूंवर होणारा परिणाम, तसंच पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनची उपलब्धता कमी होत असल्यानं वातावरणातली तापमानवाढ ही या माशांसाठी एक बहुआयामी आव्हान आहे; मात्र अंटार्क्टिक मासे प्रतिकूल परिस्थितीशीही जुळवून घेऊ शकतात, हे यातून सिद्ध झालं आहे. परंतु पर्यावरणीय तापमानवाढीच्या परिणामांबद्दल आताच अधिक सांगता येणार नाही,' असं फ्रीडलँडर यांनी नमूद केलं.

  'आम्ही वर्णन केलेल्या माशांच्या वर्तणुकीतील बदल हे दाखवतात, की या माशांमध्ये पर्यावरणीय बदल सहन करण्याची जबरदस्त शारीरिक क्षमता आहे,' असं या संशोधन अहवालाचे प्रमुख लेखक आणि प्रयोगशाळेतले संशोधन सहायक प्राध्यापक इस्कंदर इस्माइलोव्ह म्हणाले. अंटार्क्टिक सर्कमपोलर करंटमुळे, उर्वरित जगापासून दूर राहिल्यानं दक्षिण महासागरातल्या माशांच्या प्रजाती इथल्या बर्फाच्छादित पर्यावरणास अनुकूलपणे विकसित झाल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

  शास्त्रज्ञांनी संशोधन केलेल्यांपैकी ब्लॅकफिन आइसफिश, चेनोसेफॅलस अॅसेरॅटस या प्रजातींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते. या अत्यंत दुर्मीळ असून, लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे एक प्रथिन जे फुफ्फुसातून संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहतूक करतं, ते यांच्यामध्ये नसते. त्याऐवजी, ब्लॅकफिन आइसफिशच्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये ऑक्सिजन विरघळतो. हे प्रमाण हिमोग्लोबिनच्या ऑक्सिजन वाहून नेण्याच्या क्षमतेच्या सुमारे 10 टक्के असतं. यासह शास्त्रज्ञांनी रक्त असलेल्या माशांच्या प्रजातीची निवड केली होती. या माशांवर प्रयोग करण्यापूर्वी त्यांना प्रयोगशाळेतल्या तापमानाशी जुळवून घेण्यात आलं होतं. प्रायोगिक टँकमध्ये पाण्याचं तापमान -1.8 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत दरतासाला 3 अंश या वेगाने वाढवण्यात आलं होतं. संशोधकांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे माशांची हालचाल, श्वासोच्छ्वासाचा दर, त्यांच्या पंखांच्या हालचाली यांच्या नोंदी घेऊन विश्लेषण केलं आणि निष्कर्ष नोंदवले.

  First published:
  top videos

   Tags: Fish