मुंबई, 08 जानेवारी: टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita hassanandani) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. लवकरच ती गुड न्युज देणार आहे. सध्या ती गरोदर (Pregnant) आहे. अनिता अनेकदा तिचा नवरा रोहित रेड्डीसोबत (Rohit Reddy) मजेदार व्हिडिओ (Funny videos) शेअर करत असते. अनितानं नुकतचं बेबी बंपसह डान्सचा (Baby bump Dance) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती शकीरा गाण्यावर (Shakira Song) डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अनिता हसनंदानीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या बेबी बंपसह दिसत आहे. व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना अभिनेत्रीनं लिहिलं की, 'जो एकदा शकीराचा फॅन बनतो त्यानंतर तो आयुष्यभरासाठी शकीराचा फॅन असतो.'
अनिताचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडू लागला आहे. अनिता ज्याप्रकारे आपल्या बेबी बंपसह डान्स करत आहे, त्यावर अनेक चाहते फिदा झाले आहेत. त्यांना वाटतयं की पोटातलं बाळही या डान्स स्टेप्स शिकेल. तर काही चाहत्यांनी काळजीदेखील व्यक्त केली आहे. अनिताचे चाहते म्हणतात की, त्यांनी यावेळी स्वत: ची काळजी घ्यावी आणि असे काहीही करु नये, ज्यामुळे तिला आणि तिच्या बाळाला हानी होईल.
View this post on Instagram
2013 मध्ये अनिता आणि रेहितचं लग्न झालं होतं. आता लग्नाच्या सात वर्षानंतर अनिता वयाच्या 39 व्या वर्षी आई बनणार आहे. हा क्षण त्यांच्यासाठी खरोखर आनंदाचा आहे. अनिताने अलीकडेच सांगितलं होतं की, जर तिला मुलगा झाला तर त्याचं नाव रवी ठेवू. याचे कारण सांगताना अनिता म्हणाली होती की, रोहितच्या वडिलांचं नाव रवी होतं. गरोदरपणाच्या बातमीनंतर, काही दिवसांनी रोहितच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tv actress, Video