मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राग आला की नुसता तिळपापड होतो? या टिप्स तुमच्या डोक्यावर जणू बर्फ ठेवतील

राग आला की नुसता तिळपापड होतो? या टिप्स तुमच्या डोक्यावर जणू बर्फ ठेवतील

रागावर नियंत्रण ठेवायच्या टिप्स

रागावर नियंत्रण ठेवायच्या टिप्स

जास्त राग येणारे लोक नैराश्य, निद्रानाश, डोकेदुखी आणि भूक न लागणं अशा समस्यांना बळी पडतात. त्यामुळं रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल नक्की करा. येथे दिलेल्या टिप्स नक्की कामाला येतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 02 नोव्हेंबर : अनेकदा आपल्या मनासारखं काम न झाल्यानं खूप राग येतो. अनेकदा जोडीदारासोबत शब्दाला शब्द वाढतो. रागावर नियंत्रण ठेवणं अशक्य होतं. मात्र, हा राग आपल्याला विविध प्रकारे नुकसान पोचवू शकतो.

रागामुळं अनेकदा नाती तुटतात. आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठीही राग हानिकारक असतो. जास्त राग येणारे लोक नैराश्य, निद्रानाश, डोकेदुखी आणि भूक न लागणं अशा समस्यांना बळी पडतात. त्यामुळं रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल नक्की करा. येथे दिलेल्या टिप्स नक्की कामाला येतील.

सकारात्मक विचार करा

कधीही खूप राग येईल तेव्हा सकारात्मक दिशेनं विचार करण्याचा प्रयत्न करा. कोण काय म्हणत आहे, कोणाची प्रतिक्रिया काय आहे, याकडे नीट लक्ष द्या. यामुळं तुमचा राग  शांत होईल.

असं करा कंट्रोल

अनेकदा राग तुमच्या नात्यात एक भिंत बनून उभा राहतो. नाती तुटण्याचं कारणही राग बनू शकतो. राग आल्यावर कंट्रोल करण्यास मनातल्या मनात उलटे आकडे 10 ते 1 असे मोजा.

शांत राहा आणि दीर्घ श्वास घ्या

रागामध्ये हृदयाचे ठोके खूप वाढतात. अशावेळी दीर्घ श्वास घ्या. तुमच्या सगळ्या इंद्रियांना आराम मिळेल. यातून तणाव कमी होईल. रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळेल.

सखोल विचार करा

एकदा का आपल्या रागावर नियंत्रण मिळवलंत कि मग विचार करा की मुद्दा काय आहे, कुणाची चूक होती आणि नेमका काय मार्ग आहे. यातून फायदा हा होईल की तुम्हाला तुमची चूकही समजेल.

स्वतःसोबत काही वेळ घालवा

हा अखूप प्रभावी मार्ग असेल. रागाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, इतरांहून राग तुमचं स्वतःचं जास्त नुकसान करतो. त्यामुळं तो नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न करा.

हे वाचा - टुथब्रश किती दिवसांनी बदलावा? अनेकजण फक्त घासत राहतात-घासत राहतात

चांगली झोप नक्की घ्या

अनेकदा राग येण्यामागे अपुरी झोप हेसुद्धा कारण असू शकतं. झोप झाली नसेल तर आपण लहान-सहान गोष्टीत चिडचिड करू लागतो. त्यामुळं झोप पूर्ण होते आहे ना याकडं लक्ष नक्की द्या.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

First published:

Tags: Health Tips, Relationship tips