मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Anger Causing Food : खरंच! हे पदार्थ तुम्हाला बनवू शकतात रागीट, वेळीच घ्या काळजी

Anger Causing Food : खरंच! हे पदार्थ तुम्हाला बनवू शकतात रागीट, वेळीच घ्या काळजी

व्यस्त दिनचर्येमुळे आणि कामाच्या ताणामुळे आपली चिडचिड होणे स्वाभाविक आहे. मात्र आपल्या आहारात काही पदार्थ असे आहेत, ज्यांच्या अतिसेवनाने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आणि आपली चिडचिड वाढते.

व्यस्त दिनचर्येमुळे आणि कामाच्या ताणामुळे आपली चिडचिड होणे स्वाभाविक आहे. मात्र आपल्या आहारात काही पदार्थ असे आहेत, ज्यांच्या अतिसेवनाने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आणि आपली चिडचिड वाढते.

व्यस्त दिनचर्येमुळे आणि कामाच्या ताणामुळे आपली चिडचिड होणे स्वाभाविक आहे. मात्र आपल्या आहारात काही पदार्थ असे आहेत, ज्यांच्या अतिसेवनाने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आणि आपली चिडचिड वाढते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 मार्च : हल्ली आपली जीवनशैली खूप धावपळीची आणि व्यस्त झाली आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या तब्येतीकडे हवे तितके लक्ष देता येत नाही. व्यस्त दिनचर्येमुळे आणि कामाच्या ताणामुळे आपली चिडचिड होणे स्वाभाविक आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? आपल्या आहारात काही पदार्थ असे आहेत, ज्यांच्या अतिसेवनाने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आणि आपली चिडचिड वाढते. GIMS हॉस्पिटल मधील आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, काही पदार्थ आपल्याला रागीट बनवण्यास कारणीभूत ठरतात. जाणून घेऊया त्या पदार्थांबद्दल.

सुका मेवा

आपल्याला उत्तम आरोग्यासाठी अनेकदा सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु हा सुकामेवा म्हणजेच काजू, बदाम, पिस्ता असे पदार्थ आपला राग वाढवण्यासदेखील कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे ते कमी प्रमाणातच खावे.

Health Tips: फ्रूट शेक पिणं आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक, आयुर्वेदात सांगितलंय 'हे' कारण

फुलकोबी

फुलकोबी खाल्ल्याने तुमच्या शरीरात एक्झा हवा तयार होऊ लागते. त्यामुळे गॅस आणि पॉट फुगण्याचा धोका असतो आणि हे तुमच्या रागाचे कारण बनते. हीच समस्या ब्रोकोली झाल्यानंतरही उद्भवते.

काही फळ

काकडी आणि टरबूज खाल्ल्याने आपले शरीर हायड्रेट राहते. परंतु राग वाढण्यास ही फळंदेखील कारणीभूत ठरू शकतात. तुम्ही अधिक तणावाखाली असाल तर ही रसदार फळं खाऊ नका.

टोमॅटो

टोमॅटो आपण जवळपास प्रत्येक पदार्थ बनवताना वापरतो. टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि माणसाला राग येऊ शकतो. ज्यांना लवकर राग येतो त्यांनी टोमॅटो कमी खावेत.

Vegetables For Monsoon : पावसाळ्यात नक्की खा या निवडक भाज्या, आजार राहतील दूर

वांगी

वांग्यामध्ये आम्लयुक्त पदार्थ जास्त असतात. ज्यामुळे तुमच्या मनात राग निर्माण होतो. जर तुम्हाला वाटत असेल की ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला राग येऊ लागला तर ते खाणे कमी करा.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle