Home /News /lifestyle /

आज अंगारकी चतुर्थी! सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम

आज अंगारकी चतुर्थी! सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम

गेले अनेक महिने राज्यातली मंदिरं दर्शनासाठी बंद आहेत. Coronavirus Lockdown च्या पार्श्वभूमीवर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मुंबईचं प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दर्शन कसं होणार?

    मुंबई, 27 जुलै: मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक योग म्हणतात. संकष्टी चतुर्थी 27 जुलैला म्हणजे मंगळवारी येत असल्याचे अंगारकीचा योग आहे. या अंगारक संकष्टी चतुर्थीला केलेली गणेश उपासना आणि उपवास खूप फलदायी ठरतो असं म्हणतात. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्याप महाराष्ट्रातली मंदिरं बंदच आहेत. त्यामुळे उपासनेचा मुख्य भाग गणेशदर्शन प्रत्यक्ष होणं शक्य नाही. मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर कुठल्याही चतुर्थीला भक्तांनी ओसंडून वाहात असतं.अंगारकी संकष्टीला तर विचारूच नये एवढी गर्दी असते. पोलिसांना खासा बंदोबस्त ठेवावा लागतो. पण या वेगच्या अंगारक चतुर्थीला घरात बसून व्हर्च्युअल दर्शनच घ्यावं लागणार आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने कोरोना साथीमुळे श्रींच्या प्रत्यक्ष दर्शनाकरता मंदिर बंदच असल्याचं कळवलं आहे. तुम्ही भेसळयुक्त चहा तर पित नाही ना? ‘या’ पद्धताने ओळखा चहाची शुद्धता मंदिर बंद असलं तरी अंगारक योगावर श्रींची यथासांग पूजा होणार आहे. कसा असेल अंगारक चतुर्थीचा कार्यक्रम हेसुद्धा न्यासातर्फे सांगण्यात आलं आहे. सोमवारी मध्यरात्रीपासूनच अंगारक चतुर्थी कार्यक्रमाची सुरुवात होईल. 12 नंतर काकड आरती होईल आणि श्रींची महापूजा मध्यरात्री 12.20 ते 1.20 दरम्यान होईल. पहाटे 3.30 ते 4 पर्यंत महाआरती चालेल आणि दुपारी 12 वाजता नैवेद्य असेल. चंद्रोदयाची वेळ मंगळवारी रात्री 9 वाजून 59 मिनिटांनी आहे. रात्री 8.30 ते 10 दरम्यान महापूजा, महाआरती आणि नैवैद्य असा कार्यक्रम असेल. 10.30 ला शेजारतीनंतर मंदिर बंद होईल. सामान्य भक्तांसाठी मंदिराची दारं बंद असली, तरी या सगळ्या कार्य़क्रमाचं थेट प्रक्षेपण (Live streaming) बघू शकता. सिद्धिविनायक न्यासातर्फे त्यासाठी facebook आणि instagram वरून live streaming केलं जाईल. तसंच सिद्धिविनायक टेम्पल अॅपमध्येही दर्शन होईल.
    First published:

    Tags: Siddhivinayak Mandir

    पुढील बातम्या