• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला हातावर बांधल्या जाणाऱ्या अनंत सूत्राचं हे आहे महत्त्व

Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला हातावर बांधल्या जाणाऱ्या अनंत सूत्राचं हे आहे महत्त्व

अनंत चतुर्दशीदिवशी श्री गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन त्याचं विसर्जन (Ganesh visarjan day muhurat) केलं जातं. आणि याच दिवशी अनंताची पूजाही (Aanant chaturdashi puja)बांधली जाते.

  • Share this:
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर: अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) दोन गोष्टींसाठी महत्त्वाचं असते. गणेश चतुर्थीला मोठ्या भक्तिभावानं घरोघरी श्री गणरायाचं आगमन होतं. दहा दिवसांच्या पारंपरिक उत्सवानंतर अनंत चतुर्दशीदिवशी श्री गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन त्याचं विसर्जन (Ganesh visarjan day muhurat) केलं जातं. आणि याच दिवशी अनंताची पूजाही (Aanant chaturdashi puja)बांधली जाते. भगवान श्री विष्णूंच्या पूजनाच्या (Lord Vishnu) अनुषंगानेदेखील अनंत चतुर्दशी महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान श्री विष्णूंचं अनंत स्वरूपात पूजन (Vishnu Pooja) केलं जातं. अनंत चतुर्दशी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या चतुर्दशीला असते. यंदा अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबरला आहे. या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केल्यानंतर 14 गाठींचं `अनंत सूत्र` हातात बांधलं जातं. याचं महत्त्व विषद करणारी माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा प्रसाद समजलं जाणारं `अनंत सूत्र` परिधान केल्यानंतर रात्रीच्या वेळी ते काढून बाजूला ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी पवित्र नदीत किंवा सरोवरात त्याचं विसर्जन करावं. दुसऱ्या दिवशी ते विसर्जन करणं शक्य झालं नाही, तर त्या व्यक्तीला पुढील 14 दिवस अनंत सूत्र परिधान करावं लागतं. तसंच 14 दिवसांनंतरही अनंत सूत्राचं विसर्जन शक्य झालं नाही, तर संबंधित व्यक्तीला हे सूत्र वर्षभर म्हणजेच पुढील अनंत चतुर्दशीपर्यंत परिधान करावं लागतं. फक्त गणेश चतुर्थीलाच गणपतीला वाहतात तुळस; यामागचं कारण माहीत आहे का? अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या पूजेवेळी 14 गाठी असलेल्या अनंत सूत्राची पूजा महत्त्वाची मानली जाते. हा 14 गाठी असलेला धागा भगवान श्री विष्णूंच्या 14 लोकांचं प्रतीक मानला जातो. हा धागा किंवा सूत्र हातावर बांधल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणतंही भय किंवा बाधा येत नाही असं मानलं जातं. अशा स्थितीत भगवान श्री विष्णू आपल्या भक्ताचं रक्षण (Protection) करतात असंदेखील मानलं जातं. गणपती विसर्जनाची तयारी करण्याअगोदर हे नियम वाचा
First published: