अंडे का फंडा : रेकॉर्डब्रेक लाइक्स, असं आहे तरी काय या फोटोत?

अंडे का फंडा : रेकॉर्डब्रेक लाइक्स, असं आहे तरी काय या फोटोत?

एखाद्या सुपरस्टारनं किंवा फेमस ब्रँडने सोशल मीडियावर पोस्ट केली तर ती हजार, लाखांत पोहचते. क्वचितच कोणालातरी कोटीमध्ये लाइक्स मिळतात. पण या अंड्याच्या फोटोला तब्बल २ कोटी लाइक्स मिळाल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल आणि चर्चेत येईल सांगता येत नाही. आताही एका साध्या अंड्यानं इन्स्टाग्रामवर वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे. तुमच्या-आमच्या पोस्टवर लाइक्सची शंभरी किंवा फार तर हजार पार झाले तरी भरपूर होतात. एखाद्या सुपरस्टारनं किंवा फेमस ब्रँडने सोशल मीडियावर पोस्ट केली तर ती हजार, लाखांत पोहचते. क्वचितच कोणालातरी कोटीमध्ये लाइक्स मिळतात.

 

View this post on Instagram

 

Let’s set a world record together and get the most liked post on Instagram. Beating the current world record held by Kylie Jenner (18 million)! We got this 🙌 #LikeTheEgg #EggSoldiers #EggGang

A post shared by EGG GANG 🌍 (@world_record_egg) on

बऱ्याच दिवसांपासून सोशल मिडियावर पोस्ट करणाऱ्यांचे फॉलोअर्सदेखील हळूहळू वाढतात. त्या व्यक्तीची लोकप्रियता, केल्या जाणाऱ्या पोस्ट यावर सगळं अवलंबून असतं. मात्र या सगळ्याला तडा गेलाय तो एका अंड्याच्या फोटोमुळे. ते साधं म्हणजे साधंच अंड आहे. त्या पलिकडे त्यात वेगळं असं नाही. तरीही अंड्याच्या फोटोला तब्बल 2 कोटी 57 लाख 31 हजार इतक्या लाइक्स आल्या आहेत. त्या युजरनं फक्त तेवढा एकच फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या 25लाखांच्यावर आहे.

विशेष म्हणजे या पोस्टनं सोशल मीडियावर कायली जेनर या अमेरिकन अभिनेत्रीलाही मागं टाकलं आहे.  सर्वात जास्त लाइक मिळवलेल्या अंड्यानंतरची दुसरी पोस्ट कायली जेनरची आहे. त्याला 1 कोटी 83 लाख लाइक्स आहेत.

 

View this post on Instagram

 

stormi webster 👼🏽

A post shared by Kylie (@kyliejenner) on

दहा दिवसांपूर्वी 4 जानेवारीला हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. काल (रविवार दि. 13) हा फोटो इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड ब्रेक लाइक्स मिळवणारा फोटो ठरला आहे. युजरने तो फोटो का टाकला? याबाबत कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही.

 

View this post on Instagram

 

Take that little egg

A post shared by Kylie (@kyliejenner) on

इंटरनेटवर असं काही व्हायरल होणं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी लाइक करण्याची पहिलीच घटना नाही. 2017 मध्ये कार्टर विल्करसन नावाच्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचं ट्विट सर्वात जास्त वेळा रिट्विट करण्यात आलं होतं

भारतात म्हणाल तर गेल्या वर्षी प्रिया प्रकाश वारियरच्या एका व्हिडीओनं कमाल केली होती. अल्पावधीतच तिच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर गोविंदाच्या गाण्यावर डान्स करुन डब्बू अंकलही फेमस झाले होते.

First published: January 14, 2019, 4:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading