केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय -एरंडेल तेल

केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय -एरंडेल तेल

केस गळणे, कमकुवत होणे, अशा समस्या असतील तर आजपासूनच एरंडेल तेल वापरायला सुरुवात करा

  • Share this:

17 जुलै:एरंडेल तेल हे निसर्गाने दिलेल एक वरदान आहे. जे आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तसंच अनेक प्रकारे याचा उपयोग केला जातो. यामध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे कितीतरी रोगांपासून आपले संरक्षण होतं.

एरंडेल तेल  केसांच्या समस्यांवर वापरले जाते. केस गळणे, कमकुवत होणे, अशा समस्या असतील तर आजपासूनच एरंडेल तेल वापरायला सुरुवात करा. तसंच आरोग्यासंबंधी असणाऱ्या संयुक्त वेदना, त्वचारोग, बद्धकोष्ठता याच्यांसाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे.

एरंडेल तेल केस गळण्यापासून संरक्षण करतात

केसांच्या समस्यांवर एरंडेल तेल हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये असणाऱ्या 'ओमेगा 6' फॅटी अॅसिड्समुळे केस गळण्यापासून संरक्षण होते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. 3 चमचे एरंडेल तेल आणि जोजोबा तेल एकत्र करुन एका कुपीत ठेवा. रात्री झोपयच्या आधी हे तेल ड्रॉपरच्या मदतीने केसांच्या मुळांना आणि केसांना लावून नीट मालीश  करा आणि सकाळी उठून शॅम्पूने केस धुवा.

डॅन्ड्रफपासून संरक्षण

एरंडेलच्या तेलामुळे डॅन्ड्रफ कमी होण्यास मदत होते. यासाठी एक चमचा एरंडेल तेल, एक चमचा ऑलिव्ह तेल आणि अर्धा चमचा लिंबूचा रस एकत्र करुन ते गरम करा आणि हलक्या हाताने मुळांना लावून आर्धा तास ठेवा. नंतर शॅम्पूने केस धुवून घ्या.

कमकुवत केसांसाठी फायदेशीर

एरंडेल तेल कमकुवत केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तसंच केसांना सुंदर आणि तेजस्वी बनवण्यासाठी 5 ड्रॉप एरंडेच तेल, 10 ड्रॉप जोजोबा तेल, 3 ड्रॉप खोबरेल तेल आणि 4 ड्रॉप सुवासिक सदाहरीत फुलाचे तेल एकत्र करुन केसांना आणि मुळांना लावून मालीश करा. नंतर अर्ध्या तासाने शॅम्पूने केस धुवून घ्या.

First published: July 17, 2017, 7:02 PM IST

ताज्या बातम्या