न्यूझीलंडमध्ये मंत्री झालेल्या प्रियांका राधाकृष्णन यांना अमूल गर्लने दिल्या अनोख्या शुभेच्छा

न्यूझीलंडमध्ये मंत्री झालेल्या प्रियांका राधाकृष्णन यांना अमूल गर्लने दिल्या अनोख्या शुभेच्छा

अमूलने (Amul) नेहमीच स्वत:च्या खास शैलीत, अनेक महत्त्वाच्या घटनांवर आधारित ग्राफिक तयार करत असतं आणि भाष्य करत असतं. अमूल गर्ल प्रियांका राधाकृष्णन (Priyanka Radhakrishnan) यांच्याबद्दल काय म्हणतेय पाहा..

  • Share this:

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : भारतीय वंशाच्या न्यूझीलंडमधल्या राजकारणी प्रियांका राधाकृष्णन (Priyanca Radhakrishnan) यांचा जेसिंडा आर्डर्न (Prime Minister Jacinda Ardern) यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला. न्यूझीलंडमध्ये (Newzeland) मंत्रिपद मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत.

कामगार पक्षाच्या पंतप्रधान जसिंडा आर्डर्न या जगातल्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधान ठरत असताना त्यांच्या मंत्रिमंडळात भारतीय महिलेला स्थान मिळणं ही मोठी गोष्ट आहे. राधाकृष्णन यांच्यवर सोशल मीडियावर आणि इतर सर्वच घटकांमधून कौतुक व अभिनंदना भरपूर वर्षाव झाला.  काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या. अमूलनेही खास त्यांच्या शैलीत प्रियांका यांचं अभिनंदन केलं आहे.

भारतीय डेअरी कंपनी अमूलने नेहमीच स्वत:च्या खास शैलीत, अनेक महत्त्वाच्या घटनांवर आधारित ग्राफिक तयार  केली आहेत. त्यांचं ग्राफिक हे दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनांवर समर्पक टिप्पणी करण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे.  या वेळी सुद्धा त्यांनी फॅन्सना निराश केलं नाही आणि किवी नेत्याला समर्पित एक प्रेरणादायक ग्राफिक तयार केले.

हे प्रेरणादायक ग्राफिक अमूल डेअरी कंपनीने त्यांच्या इन्स्टाग्राम व ट्विटर हँडलवर शेअर केले होते आणि असे लिहिले होते की, “प्रथम पिढीतील स्थलांतरितांमधील भारतीय व्यक्ती न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा मंत्री बनली आहे!” प्रतिमेच्यावर “Immigrate achievement” असं लिहिलं आहे. या ग्राफिकमध्ये राधाकृष्णन या अमूल गर्लबरोबर उभ्या असल्याचे दिसत आहे. फोटोच्या तळाशी, “इट्स राधा वण्डरफुल” लिहिलं आहे.

41 वर्षीय राधाकृष्णन यांचा जन्म केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात झाला व त्या आयआयटीच्या  माजी विद्यार्थी आहेत. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण सिंगापूरमध्ये आणि त्यानंतर न्यूझीलंडमध्ये वेलिंग्टन विद्यापीठातून डेव्हलपमेंट स्टडीज विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

2006 मध्ये राधाकृष्णन न्यूझीलंड देशातील डाव्या विचारसरणीच्या लेबर पार्टीमध्ये सामील झाल्या आणि 2017 मध्ये त्या आर्रर्नच्या पक्षाच्या खासदार झाल्या. दोन वेळा खासदार असलेल्या राधाकृष्णन यांनी लेबर पक्षामध्ये नेता म्हणून 14 वर्षे व्यतीत केली आहेत.

या ग्राफिकबद्दल ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. एकाने ट्विटमध्ये म्हटलंय, ‘तुमच्या या जाहिराती कोण लिहितं माहीत नाही. पण हे ग्राफिक म्हणजे आणखी एक मास्टरपीस. समयसूचक, मुद्देसूद जाहिरात अभिनंदन.’ इन्स्टाग्रामवरील ग्राफिकला 3000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. एका यूझरने कमेंट केली की, "ओह @amul_india ऑन पॉईंट प्रत्येकवेळी!!!

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 4, 2020, 11:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या