मुंबई, 31 ऑक्टोबर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी गूड न्यूज दिली आहे. काही जणांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे तर काही जणांच्या घरी लवकरच पाळणार हलणार आहे. यादरम्यान मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरनंदेखील (amruta khanvilkar) आनंदाची बातमी दिली आहे. अमृताच्या घरीदेखील नवी पाहुणी आली आहे. अमृताने आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांना ही गूड न्यूज दिली.
अमृता खानविलकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपले फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र आता तिनं आपला नाही तर आपल्या घरातील छोट्या परीचा फोटो शेअर केला आहे. ही छोटी परी म्हणजे अमृताची भाची.
अमृताने आपण मावशी झाल्याचं सांगितलं आहे. अमृताच्या बहिणीला मुलगी झाली आहे आणि पुन्हा एकदा मावशी झाल्याचा आनंद अमृताला झाला आहे. तिनं आपल्या चाहत्यांसह हा आनंद शेअर केला. आपल्या बहिणीसह चिमुकलीचा फोटो तिनं शेअर केला आहे. अमृताच्या भाचीचं नाव आहे नुरवी. नुरवीचं स्वागत करा अशी कॅप्शन तिनं या फोटोला दिली आहे. 29 ऑक्टोबरला नुरवीचा जन्म झाल्याचं तिनं सांगितलं. आई आणि बाळ दोघंही उत्तम आहेत, अशी माहितीही तिनं दिली आहे.