मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बोल 'बच्चन' मास्कचा VIDEO पाहाच! अमिताभ यांच्या आवाजात बोलतो हा मास्क

बोल 'बच्चन' मास्कचा VIDEO पाहाच! अमिताभ यांच्या आवाजात बोलतो हा मास्क

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) चाहत्यांना ट्विटरवरून शुभेच्छा देताना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांचा नवीन मास्क (LED Mask) दाखवला. कसला भारी आहे पाहा VIDEO. ओठांच्या हालचालीप्रमाणे लागतात LED लाइट्स.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 26 जानेवारी: बॉलीवूडचा महानायक (Bollywood actor) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. ते प्रत्येक सण आणि उत्सावाच्या दिवशी आपल्या चाहत्यांना ट्वीट करून किंवा इन्स्टाग्राम पोस्ट टाकून शुभेच्छा देत असतात. आज प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्तानेही त्यांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना त्यांनी खरेदी केलेला नवीन एक नवीन मास्क (New LED Mask) दाखवला आहे.

या व्हिडिओमध्ये बीग बी यांनी म्हटलं की, "मला फक्त माझ्या नवीन खरेदी केलेल्या वस्तूची ओळख करुन द्यायची होती." असं म्हणत त्यांनी त्यांचा मास्क परिधान केला. ज्यावेळी त्यांनी हा अनोखा मास्क परिधान केला, तेव्हा त्या मास्कमध्ये एलएडी लाईट्स लागले. हा मास्क परिधान करुन अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, त्यांच्या ओठांच्या हालचाली प्रमाणे मास्कचे एलएडी लाईट्स लागत आहेत.

बॉलीवूडच्या महानायकाने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनीटातच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांनी घातलेला मास्क अनेकांना आवडला असून हा मास्क खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या टीव्ही कार्यक्रमाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहेत. यांनतर अमिताभ बच्चन अजय देवगण दिग्दर्शित 'मे डे' (Mayday) या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहेत. 78 वर्षांचे अमिताभ बच्चन अजूनही एखाद्या तरण्या अभिनेत्याप्रमाणे काम करत आहेत. मेडे व्यतिरिक्त अमिताभ बच्चन इमरान हाश्मीसोबत 'चेहरे' या चित्रपटात दिसणार आहेत तर, नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' चित्रपटात अमिताभची मुख्य भूमिका असणार आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Mask