गांधीनगर, 12 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील अभिनेत्यांचे आणि अभिनेत्रींचे अनेक फॅन असतात. त्यापैकी काही फॅन असे असतात जे आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीही करायला तयार असतात. बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांचा देखील असाच एक तगडा फॅन आहे.
काल 11 ऑक्टोबरला बच्चन यांचा 78 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचा हा फॅन सर्वांच्या समोर आला. याचं नाव आहे, दिव्येश कुमार. गुजरातच्या सुरतमध्ये राहणाऱ्या दिव्येशने अमिताभ यांचे तब्बल 7 हजार फोटो जमा केले आहेत. 1999 सालापासून त्याने अमिताभ यांचं फोटो कलेक्शन सुरू केलं.
Gujarat: A man in Surat says he has been collecting photos of actor Amitabh Bachchan since 1999. Divyesh says, "I have collected over 7,000 photos of Amit ji & met him on 10 occasions in my life. I plant 11 saplings on his birthday every year." pic.twitter.com/DPasP69vz5
दिव्येशनने फक्त अमिताभ यांचे फोटो जमवण्याचं काम केलं नाही. तर अमिताभ यांच्या वाढदिवशी तो वृक्षारोपणही करतो. इतकंच नव्हे तर कुमार यांनी बच्चन त्यांच्याप्रमाणेच अवयवदान करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. अमिताभ यांचा हा निर्णय खूपच उत्तम आहे. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य अवयव दान करणार आहेत, असं दिव्येशनं एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
दिव्येशला अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी 10 वेळा मिळाली आहे. या भेटीवेळी त्यांनी बच्चन यांना त्यांच्या सर्व चित्रपटांची नावे असलेला फोटो भेट दिला होता. त्याचबरोबर बच्चन यांची नात आराध्याला खेळणंदेखील दिलं होतं.
आपल्या वाढदिवशी आपल्याला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आभार मानले होते. त्यांनी विविध भाषांमध्ये धन्यवाद लिहिलं होतं.
अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्याचप्रमाणे अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्र' या सिनेमात देखील ते दिसणार आहेत. त्यांच्याबरोबर रणबीर कपूर आणि आलिया भट देखील या सिनेमात काम करत आहेत.