लीवर सिरोसिस आजाराशी लढतायेत बिग बी, जाणून घ्या याची लक्षणं

लीवर सिरोसिस आजाराशी लढतायेत बिग बी, जाणून घ्या याची लक्षणं

या आजारामुळे शरीरात नेहमी थकवा जाणवत असतो. तसेच भूक कमी लागते आणि त्वचेचा रंग फिकट पिवळा होऊ लागतो.

  • Share this:

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना काल  शुक्रवारी रात्री उशीरा डिस्चार्ज देण्यात आला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अमिताभ यांच्या आजाराबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झाली आहे. ते स्वतःही त्यांच्या आजारावर आणि संघर्षावर खुलून बोलताना दिसतात. त्यांना यकृताशीनिगडीत आजार आहे. या आजाराला लीवर सिरोसिस असं म्हणतात. बिग बी यांचं फक्त 25 टक्के यकृत काम करत आहे. लीवर सिरोसिस हा एक असा आजार आहे, यात यकृताच्या पेशी हळूहळू नष्ट होऊ लागतात. आज आपण याच आजाराबद्दल जाणून घेऊ...

medicinenet वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, लीवर सिरोसिस हा आजार होण्याची अनेक कारणं आहेत. यात मद्यपान, हेपिटायटिस बी आणि सी याशिवायही अनेक कारणं आहेत. या आजारामुळे शरीरात नेहमी थकवा जाणवत असतो. तसेच भूक कमी लागते आणि त्वचेचा रंग फिकट पिवळा होऊ लागतो. कावीळ होते, खाज येणं, लठ्ठपणा आणि त्वचेचा रंग निळाही (bruising) होऊ शकतो. लीवर बायोप्सीच्या (liver biopsy) मदतीने सिरोसिस आजाराचं निदान होतं. यात रुग्णाचा वैद्यकिय इतिहास, रक्ताची चाचणी याच्या आधारावर सिरोसिसचं निदान करता येतं.

सिरोसिसमुळे होतात या समस्या-

लीवर सिरोसिसमुळे पोटात, जांघेत, पायात आणि टाचात सतत सूज आल्यासारखं वाटतं.

यासोबतच यात varices समस्याही निर्माण होतात. यात नसांमध्ये सूज येते आणि रक्ताभिसरण सुरळीत होत नाही.

काय असतं  सिरोसिस-

यकृतात बिघाड झाल्यामुळे सिरोसिसचा आजार होतो. यात यकृतातील पेशी हळूहळू नष्ट होऊ लागतात आणि यानंतर शरीर सुजल्यासारखे वाटते. यात यकृत काम करणंही बंद करतं. जेव्हा या आजारात यकृताच्या पेशी नष्ट होऊ लागतात तेव्हा यकृत स्वतः ठीक होण्याचा प्रयत्न करत असतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे नवीन तयार झालेल्या टिश्यूवर अनेक जखमा होतात. खराब झालेले टिश्यू चांगल्या टिश्यूंशी स्वतःला बदलवतात त्यामुळे समस्या जास्त वाढतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

याहून सोप्या रांगोळी डिझाइन तुम्हाला Tiktok, Youtube शिवाय दुसरीकडे दिसणार नाहीत

आता रात्रीची शिळी चपाती करणार मधुमेहावर उपचार, खायला विसरू नका!

या योगासनांच्या मदतीने करा पोटाची चरबी कमी, कधीही घ्यावी लागणार नाहीत औषधं!

आता खुशाल झोपा, कारण तुमच्या प्रत्येक समस्येवर हेच आहे उत्तर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 01:07 PM IST

ताज्या बातम्या