एका शोमध्ये तिला याच पक्ष्याची अंडी का कोंबडीची का नाही खात यावर तिने क्वील पक्ष्याची अंडी गर्भधारणेत मदत करत असल्याचं सांगितलं. हे वाचा - OMG! एका महिलेने तब्बल 69 मुलांना दिला जन्म; VIRAL PHOTO मागील नेमकं सत्य काय? बेबी कन्सिव्ह करण्यासाठी ती खास डाएट घेत आहे. यानंतर खरंच या पक्ष्याची अंडी खाल्ल्याने प्रजननक्षमता वाढते का, असा प्रश्न पडला आहे. क्वील पक्ष्याची अंडी खाल्ल्याने खरंच प्रजननक्षमतेवर परिणाम होतो? वेब एमडी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार क्वील पक्ष्याच्या अंडीत प्रोटिन, व्हिटामिन सी आणि व्हिटामिन ए असतं. त्यामुळे ही अंडी मांसपेशी बनवण्यात, पचन वाढवण्यात मदत करतात आणि इम्युनिटी मजबूत करतात. एका अंड्यातून पुरेशा प्रमाणात व्हिटामिन बी12 मिळतं, जे मेटाबॉलिज्म वाढीस मदत करतं आणि मेंदूचं आरोग्य सुधारतं. काही लोकांच्या मते क्वील पक्ष्याची अंडी लैंगिक आरोग्यासाठी चांगली असल्याचं मानलं आहे. पण ती प्रजननक्षमता वाढवण्यात फायदेशीर आहे, याचे पुरावे नाहीत. 2017 साली डायबिटिक उंदरावर केलेल्या संशोधनत या अंड्यामुळे त्या उंदरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेल घटल्याचं आणि टेस्टिकुलर सेल रिपेअरला चालना मिळाल्यासं दिसून आलं. हे वाचा - बेडरूममध्ये एकटं झोपायला घाबरत होती लेक; कारण समजताच हादरली आई नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार टाइम्स ऑफ इंडियातील एका लेखात आहारतज्ज्ञ तमसीन जॉर्डन यांनी सांगितलं की, क्वील पक्ष्याच्या अंड्याचा प्रजननक्षमतेशी काही संबंध नाही. या अंड्यामुळे गर्भधारणेत मदत होते, यावर अधिक संशोधन करण्याची गरज आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.