मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोपराला छोट्याशा दुखापतीनंतर त्याच्या डोक्यात सुरू झाल्या भयंकर वेदना; रिपोर्ट पाहून हादरला

कोपराला छोट्याशा दुखापतीनंतर त्याच्या डोक्यात सुरू झाल्या भयंकर वेदना; रिपोर्ट पाहून हादरला

ज्याला तो कोपराची किरकोळ दुखापत समजत होती, त्याचे डोक्यात इतके भयंकर परिणाम होतील याचा विचारही त्याने स्वप्नात केला नव्हता.

ज्याला तो कोपराची किरकोळ दुखापत समजत होती, त्याचे डोक्यात इतके भयंकर परिणाम होतील याचा विचारही त्याने स्वप्नात केला नव्हता.

ज्याला तो कोपराची किरकोळ दुखापत समजत होती, त्याचे डोक्यात इतके भयंकर परिणाम होतील याचा विचारही त्याने स्वप्नात केला नव्हता.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 19 फेब्रुवारी : आपल्याला छोट्या छोट्या दुखापती होतच असतात. त्यावेळी किरकोळ जखमाही होतात. त्यावर आपण मलमपट्टी करतो. पण त्याला फार गांभीर्याने घेत नाही. अमेरिकेतील एका व्यक्तीनेही तेच केलं. पण या छोट्याशा जखमेचा इतका भयंकर परिणाम होईल याचा विचार त्याने स्वप्नातही केला नव्हता. त्याच्या कोपराला छोटीशी दुखापत झाली, त्यानंतर त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाला. वैद्यकीय तपासणीत जे समोर आलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली (American man rare disease). अमेरिकेच्या रोड आयलँडमध्ये राहणारा 35 वर्षांचा  टायसन बॉटेनस (Tyson Bottenus). 4 वर्षांपूर्वी तो आपली होणारी बायको लीजासोबत फिरण्यासाठी कोस्टा रिकाला गेला होता. एक दिवस दोघंही सायकलिंग करत होते, तेव्हा टायसन सायकलवरून पडला. त्याच्या कोपराला जखम झाली. पण ही दुखापत छोटीशी असल्याने टायसनला त्याचं फार काही वाटलं नाही. त्याने पाण्याने धुवून ती जखम स्वच्छ केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने नर्सकडून त्यावर मलमपट्टी करून घेतली. अशा छोट्या जखमा घेऊन बरेच लोक येतात त्यामुळे नर्सलाही ती जखम फार गंभीर वाटली नाही. सुट्टी एन्जॉय केल्यानंतर हे कपल अमेरिकेला आपल्या घरी परतलं. त्यानंतर  3 आठवड्यांनी टायसनच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागल्या.  त्याच्या चेहऱ्यावर लकवा मारला. त्याला हसणंही अशक्य होत होतं. त्याने बऱ्याच डॉक्टरांकडून आपली तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी टीबी, एड्स अशा बऱ्याच आजारांच्या टेस्ट त्याला करायला सांगितल्या पण यापैकी त्याला काहीच नसल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट झालं. हे वाचा - बापरे! क्युट स्माइलच्या नादात तोंडाची लागली वाट; तरुणीचं तोंड कायमचं वाकडं झालं त्याचवेळी मॅसाचुसेट्समधील एका रुग्णालयात ब्रेन कॅन्सरच्या प्रकाराबाबत माहिती मिळवताना डॉक्टरांना समजलं की टायसनच्या मेंदूत ब्लॅक फंगस (Black fungus in brain) घुसला आहे. त्याच्या मेंदूत Cladophialophora bantiana हा दुर्मिळ फंगस होता. ज्यामुळे त्याला  ब्लॅक फंगस मोल्ड झाला होता (Rare black fungus mold in brain). त्याच्या मेंदूचा एक भाग काळा पडत होता (Man’s part of brain turned black). हा मेंदूचा अत्यंत दुर्मिळ असा आजार आहे. 1911  साली या आजाराबाबत माहिती झाली. तेव्हापासून आतापर्यंत या आजाराचे फक्त 120 प्रकरणं समोर आली आहेत.  टायसनला कोपराला झालेल्या दुखापतीमुळे त्याला हा आजार झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी बांधला. हे वाचा - 6 वर्षांच्या मुलासाठी धावून आले तब्बल 20000 Bikers; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी टायसनवर उपचार सुरू करण्यात आले पण औषधांचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्याची दृष्टी आता कमजोर झाली आहे. त्या अंधत्वही येऊ शकतं, असं डॉक्टरांना वाटतं आहे. त्याचा आवाज बदलला आहे. तो आपली दैनंदिन कामंही करू शकत नाही.  मेंदूतील फंगसशी तो लढा देतो आहे पण तो बरा होईल अशी आशा आहे.
First published:

Tags: Brain, Health, Lifestyle, Rare disease

पुढील बातम्या