या राज्यांमध्ये आता टॉपलेस होऊन फिरू शकतात महिला!

या राज्यांमध्ये आता टॉपलेस होऊन फिरू शकतात महिला!

आंदोलन करणाऱ्या महिलांच्या मते, शरीर हे फक्त शारीरिक गरजा पूर्ण करणारी गोष्ट नाही. महिलेच्या शरीरालाही पुरुषांप्रमाणेच समान अधिकार मिळाले पाहिजेत.

  • Share this:

अमेरिकेत 'फ्री द निप्पल' चळवळीला मोठं यश मिळालं. सुप्रीम कोर्टाने महिलांना टॉपलेस होऊन फिरण्याची मुभा दिली आहे. पश्चिम अमेरिकेतील सहा राज्यांमध्ये महिला टॉपलेस होऊन फिरू शकतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. पण या राज्यांतील काही महिलांनी या चळवळीला कडाडून विरोध केला होता.  मात्र सुप्रीम कोर्टाने 'फ्री द निप्पल' चळवळीच्या बाजूने निर्णय देत टॉपलेसवर असणारी बंदी उठवली.

पश्चिमी अमेरिकेतील कोलोराडो, उताह, कॅनसस, न्यू मॅक्सिको आणि ओक्लाहोमा या सहा राज्यांमध्ये आता महिला पुरुषांप्रमाणे टॉपलेस फिरताना दिसतील. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून 'फ्री द निप्पल' ही चळवळ चालवली जात होती. यात पुरुषांप्रमाणे महिलांनाही टॉपलेस फिरण्याची मुभा मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. आंदोलन करणाऱ्या महिलांच्या मते, शरीर हे फक्त शारीरिक गरजा पूर्ण करणारी गोष्ट नाही. महिलेच्या शरीरालाही पुरुषांप्रमाणेच समान अधिकार मिळाले पाहिजेत.

ही चळवळ रोखण्यासाठी खर्च केले 2 कोटी रुपये-

'डेली मेल'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, फॉर्ट कॉलिन्स सरकारने कोलोराडो शहरात ही चळवळ रोखण्यासाठी 2 कोटींहून अधिक रुपये खर्च केले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने 'फ्री द निप्पल' चळवळीच्या बाजूने निर्णय दिला. फॉर्ट कॉलिन्स सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, कोर्टाने महिलांना टॉपलेस फिरण्याची मुभा दिली आहे. आता आम्ही शहरातील इतर महत्त्वपूर्ण गोष्टींवर पैसे खर्च करू.

अमेरिकेत आतापर्यंत होता हा नियम-

आतापर्यंत अमेरिकेत फक्त 10 वर्षांपर्यंतच्या मुलींना टॉपलेस फिरण्याची मुभा होता. मात्र काही दिवसांपूर्वी लेकसाइड बीचवर तीन महिला टॉपलेस फिरत होता त्यावर मोठा वाद सुरू झाला होता. या वादानंतरच चळवळीने व्यापक स्वरुप घेतलं होतं.

अन्न चावण्याची योग्य पद्धत कळली तर कधीही होणार नाही पोटाचे आजार!

Research: ...म्हणून विवाहबाह्य संबंधांत पुरुषांपेक्षा महिला असतात जास्त आनंदी

Vastushastra: स्वप्नातही या 7 गोष्टी घरात करू नका, नाही तर...

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 26, 2019 04:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading