जेव्हा डोनाल्ड ट्रम्पने WWE च्या मालकाची मारहाण करत केलं होतं टक्कल, जुना VIDEO पुन्हा झाला वायरल

ह्यूस्टनमध्ये आयोजित 'हाउडी मोदी'मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला. या कार्यक्रमानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचाराचं बिगुल वाजवलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 03:16 PM IST

जेव्हा डोनाल्ड ट्रम्पने WWE च्या मालकाची मारहाण करत केलं होतं टक्कल, जुना VIDEO पुन्हा झाला वायरल

2020 United States Presidential Election: अमेरिकेत पुढच्या वर्षी राष्ट्रपती निवडणूक होणार असून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. ह्यूस्टनमध्ये आयोजित 'हाउडी मोदी'मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला. या कार्यक्रमानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचाराचं बिगुल वाजवलं. दरम्यान सध्या ट्रम्प यांचा WWE मधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते WWE चे मालक विन्स मॅकमहॉनला मारताना आणि त्याचे केस कापताना दिसत आहेत.

ट्रम्पच्या समर्थकांनी हा व्हिडीओ ट्विटरलवर शेअर केला असून विरोधकांना मजेशीर अंदाजात वेळीच सावध होण्याचा इशारा देत आहेत. तसेच जो कोणी ट्रम्प यांच्या विरोधात उभा राहिल त्याची अवस्था अशीच काहीशी होईल असा संदेश ते या व्हिडीओतून देत आहेत. अमेरिकेत सध्या हा व्हिडीओ तुफान शेअर करण्यात येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती नसतानाचा हा व्हिडीओ आहे. 2007 मध्ये WWE WrestleMania 23 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्ल्ड रेसलिंग एण्टरटेनमेन्टचे मालक विन्स मॅकमहॉनला मारहाण केली होती. एवढंच नाही तर त्यांचे केस कापून टक्कलही केलं होतं. Battle of the Billionaires सामन्यात विन्स मॅकमहॉनने रेसलर उमागावर पैज लावली होती. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉबी लॅशलीवर पैज लावली होती. सामन्यात सुरुवातीपासूनच चीटिंग करण्यात आली होती. सामन्याचा रेफरी विन्स मॅकमहॉनचा मुलगा शेन होता. शेन चुकीचं खेळतोय हे लक्षात आल्यावर स्टीव ऑस्टिन रेफरी म्हणून आला आणि बॉबीने तो सामना जिंकला. यानंतर डोनाल्ड ट्रम्पने विन्स मॅकमहॉनला रिंगमध्ये बसले आणि त्याचं टक्कल केलं. आता 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल झाला.

थायरॉइडमध्ये या गोष्टी चुकूनही करू नका, होईल न भरून येणारं नुकसान

Loading...

Vastushastra: पती- पत्नीमध्ये हवा असेल 'हाय रोमान्स' तर हे वास्तुदोष आजच करा दूर

महिला पोलीस ऑफिसरने केलेलं टक्कल पाहून अनुष्का शर्मा झाली चाहती, जाणून घ्या कारण

VIDEO: शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 03:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...