मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

खूशखबर! कोरोनावरील उपचारासाठी पहिल्या औषधाला मंजुरी; रुग्ण लवकर बरा होत असल्याचा दावा

खूशखबर! कोरोनावरील उपचारासाठी पहिल्या औषधाला मंजुरी; रुग्ण लवकर बरा होत असल्याचा दावा

अन्न आणि औषध प्रशासनाने कोरोना रुग्णांवर (coronavirus) आता उपचार म्हणून हे औषध वापरण्यास परवानगी दिली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने कोरोना रुग्णांवर (coronavirus) आता उपचार म्हणून हे औषध वापरण्यास परवानगी दिली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने कोरोना रुग्णांवर (coronavirus) आता उपचार म्हणून हे औषध वापरण्यास परवानगी दिली आहे.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 23 ऑक्टोबर :  कोरोनाव्हायरसवर (coronavirus) उपचारासाठी सध्या वेगवेगळ्या औषधांचं ट्रायल सुरू आहे, दरम्यान आता पहिल्या औषधाला मंजुरी मिळाली आहे. म्हणजे हे औषध ट्रायल म्हणून नाही तर कोरोना रुग्णांवर उपचारासाठीच वापरलं जाणार आहे. हे औषध म्हणजे रेमडेसिवीर  (Remdesivir). या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरा होत असल्याचा दावा केला जातो आहे.

कॅलिफोर्नियातील गिलियड सायन्सेज  (Gilead Sciences) कंपनीचं हे औषध.  अमेरिकेत कोव्हिड  19 वर उपचारासाठी रेमडेसिवीर औषधाला आधी आपात्कालीन मंजुरी दिली होती. आता  अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औषधाला उपचारासाठी मंजुरी दिली आहे आणि एफडीएकडून मंजुरी मिळालेलं हे पहिलं औषध आहे.

हे एक अँटीव्हायरल औषध आहे. इबोलाच्या रुग्णांसाठीही या औषधाचा वापर करण्यात आला होता. कोरोनाव्हायरसलाही रोखण्यात हे औषध प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहें हे औषध घेतल्याने शरीरात व्हायरसच्या प्रतिकृती तयार होत नाहीत आणि कोरोना रुग्ण 5 दिवस आधीच बरा होतो, असा दावा केला जातो आहे.

कमीत कमी 12 वर्षे असलेल्या आणि 40 किलो वजन असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जाणार आहे. शिवाय हायड्रोक्सिक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) औषधासह हे औषध देऊ नये, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. नाहीतर या औषधाच्या प्रभावावर परिणाम होईल.

गेल्या आठवड्यातच जागतिक आरोग्य संघटनेनं हे औषध रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी परिणामकारक नसल्याचं सांगितलं होतं. मात्र हा अभ्यास फार जुना होता. शिवाय या अभ्यासात प्लासबोशीही तुलना करण्यात आली नव्हती, असं सांगितलं जातं आहे.

हे वाचा - ट्रायलशिवायच भारतात दिली जाणार वादग्रस्त परदेशी लस, मोदी सरकारनं दिली परवानगी

दरम्यान अमेरिकेत दोन कोरोना लशींनाही लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील फायजर (pfizer) कंपनीची लस आणि मॉडर्ना इंक कंपनीच्या लशीला याच वर्षात परवानगी मिळू शकते. फायजर कंपनीच्या लशीत जर्मन कंपनी  BioNTech ची भागीदारी आहे. लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केला जाणार आहे. या लशीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ज्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. लशीची सुरक्षितता आणि प्रभाव समजल्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या लशीला मंजुरी मिळण्यासाठी अर्ज केला जाणार आहे. यूएस अन्न आणि औषध प्रशासनाकडे अर्ज केला जाणार असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

हे वाचा - भारत बायोटेक कोरोना लशीची लवकरच सुरू होणार तिसऱ्या टप्प्यातील चाचणी

लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार मॉडर्ना कंपनीच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकिल ट्रायलचे सकारात्मक परिणाम नोव्हेंबरमध्ये येण्याचा अंदाज आहे. जुलैमध्ये 30000 लोकांवर या लशींचं ह्युमन ट्रायल सुरू करण्यात आलं होतं.  सकारात्मक परिणाम आल्यानंतर डिसेंबरमध्येच या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते, असं मॉडर्ना इंक कंपनीचे सीईओ स्टिफन बँसेल यांनी सांगितलं.

First published:

Tags: Coronavirus