मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भारत नाही तर अमेरिकेचीच हवा घाणेरडी; डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडणारा हा रिपोर्ट

भारत नाही तर अमेरिकेचीच हवा घाणेरडी; डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडणारा हा रिपोर्ट

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय हवा खूप वाईट असल्याचं वक्तव्य केलं. भारताने वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी योग्य पावलं न उचलल्याचा आरोप केला. मात्र आता अमेरिकेचीच पोलखोल झाली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय हवा खूप वाईट असल्याचं वक्तव्य केलं. भारताने वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी योग्य पावलं न उचलल्याचा आरोप केला. मात्र आता अमेरिकेचीच पोलखोल झाली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय हवा खूप वाईट असल्याचं वक्तव्य केलं. भारताने वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी योग्य पावलं न उचलल्याचा आरोप केला. मात्र आता अमेरिकेचीच पोलखोल झाली आहे.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 27 ऑक्टोबर : अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या (US presidential election 2020) प्रचाराने जोर धरला आहे. डोनाल्ड ट्रम्प (donald trump) आणि जो बायडन यांच्यात सामना आहे. एका सार्वजनिक चर्चेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशियामधील हवा सर्वांत अशुद्ध असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अमेरिकेतील वातावरण आणि पर्यावरणावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी या चर्चेत अमेरिकेत कार्बनचे उत्सर्जन सर्वात कमी होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आकडेवारीनुसार अमेरिकेतील हवेची खरी परिस्थिती का आहे, ते समोर आलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागाने 2019 मध्ये  एमिशन गॅप रिपोर्ट प्रकाशित केला होता. त्यानुसार  याआधी आणि आताही अमेरिकेत सर्वात जास्त ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन होत आहे. ग्रीन हाऊस गॅसच्या दरडोइ उत्सर्जनाचा विचार केल्यास अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आणि एकूण उत्सर्जनाचा बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.  क्लायमेट अॅक्शन ट्रॅकरच्या अनुसार कोरोनाच्या या संकटात अमेरिकेत विषारी वायूंचे उत्सर्जन हे 10 टक्क्यांनी कमी होणार आहे. या चर्चेमध्ये कोणत्याही प्रश्नावर ट्रम्प यांच्याकडे योग्य नीती नाही असं दिसलं. ट्रम्प प्रशासनाकडे ग्रीन गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. डाउन टू अर्थच्या रिपोर्टनुसार कोरोनाच्या काळात तापमान कमी होणार आहे. त्यामुळे या काळात कमी झालेले तापमान हे आमच्या पर्यावरण नीतींमुळे कमी झाल्याचं सांगत ट्रम्प प्रशासन याचं श्रेय घेईल असंदेखील या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - 'किती बेकार हवा आहे!' चीन आणि रशियाबरोबर भारताच्या हवेलाही ट्रम्पनी ठरवलं वाईट, नेमकं काय आहे सत्य? या रिपोर्टमध्ये सांगण्यात आल्यानुसार निवडणुकीनंतर ट्रम्प सरकार पॅरिस करारामधून बाहेर पडण्याची तयारी करत आहे. त्यामुळे इराण आणि तुर्कीप्रमाणेच अमेरिकादेखील या करारातून बाहेर पडेल. त्याचबरोबर शुद्ध हवा, वन्यजीवन आणि विषारी केमिकल या बाबतीतही ट्रम्प प्रशासन अयशस्वी ठरलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या  विश्लेषणामध्ये सांगण्यात आलं आहे, पर्यावरसंबंधी 72 नियम ट्रम्प सरकारने एकतर रद्द केले किंवा त्यांच्यात बदल केले. तसेच अन्य 27 नियमांना देखील हटवण्याची तयारी सुरू आहे. उदाहरण म्हणजे पॉवर प्लांटमधून आणि गाड्यांमधून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचं प्रमाणाची मर्यादा कमी करण्यात आली आहे. सुपीक जमिनी नासवल्या आहेत. हे वाचा - 'भारताची हवा घाणेरडी', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नरेंद्र मोदी ट्रोल अमेरिकेचे राज्य सचिव माईक पॉम्पिओ आणि सुरक्षा सचिव मार्क एस्पर नवी दिल्लीमध्ये येणार आहेत. या भेटीदरम्यान अमेरिका आणि भारतात सहकार्य करार मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे. पण त्याआधी आलेले ट्रम्प यांचं वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर एनव्हायर्नमेंट प्रोटेक्शन एजन्सीनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, अफोर्डेबल क्लीन एनर्जीमुळे (ACE) 2030 पर्यंत 1630 अतिरिक्त प्री मॅच्युअर मृत्यू होऊ शकतात. त्याचबरोबर 1,20,000 अस्थमा अटॅक येऊ शकतात. 1,40,000 दिवस शाळेचे दिवस बुडू शकतात. 48,000 वर्किंग डे देखील बुडू शकतात. माजी अध्यक्ष ओबामांच्या काळात असलेला क्लीन पॉवर प्लॅन बरोबर होता तो बदलून ट्रम्प सरकारने ACE लागू केल्यामुळे त्यांच्यावर या आधीही टीका झाली आहे.
First published:

Tags: Air pollution, Donald Trump, India america

पुढील बातम्या