Home /News /lifestyle /

आश्चर्य! अनोळख्या व्यक्तीसोबत एक रात्र घालवली आणि पुरुष झाला प्रेग्नंट; बाळाला जन्मही दिला

आश्चर्य! अनोळख्या व्यक्तीसोबत एक रात्र घालवली आणि पुरुष झाला प्रेग्नंट; बाळाला जन्मही दिला

पुरुषाच्या प्रेग्नन्सीची बातमी जितकी तुमच्या आमच्यासाठी शॉकिंग आहे, तितकीच या संबंधित पुरुषासाठी आणि डॉक्टरांसाठीही शॉकिंग होती.

    वॉशिंग्टन, 07 जानेवारी : प्रेग्न्सी (Pregnancy) म्हटलं की महिलांची चर्चा होतं. पण सध्या चर्चेत आला आहे तो प्रेग्नंट पुरुष (Pregnant male). हो बरोबर वाचलं तुम्ही चक्क एक पुरुष प्रेग्नंट झाला आहे. इतकंच नव्हे तर त्याने एका बाळाला जन्मही दिला आहे (Pregnant male give birth to baby). पुरुषाच्या प्रेग्नन्सीची बातमी जितकी तुमच्या आमच्यासाठी शॉकिंग आहे, तितकीच या संबंधित पुरुषासाठी आणि डॉक्टरांसाठीही शॉकिंग होती. अमेरिकेतील (America) एका 28 वर्षांच्या पुरुषाने चक्क एका बाळाला जन्म दिला आहे. 2020 साली त्याने एका मुलीला जन्म दिला (28 Year Old Man Gives Birth to Daughter) . वेस्ट व्हर्जिनियात (West Virginia) राहणारा ऐश पॅट्रिक स्कॅडचा (Ash Patrick Schade) जन्म महिला म्हणून झाला. पण त्याला पुरुष बनायचं होतं. 2020 च्या काही वर्षे आधीपासून तो हार्मोन ट्रिटमेंट घेत होता. टेस्टेस्टेरॉन आणि ऑस्ट्रोजेनच ब्लॉकर (testosterone and oestrogen Blocker)  घेत होता. ज्यामुळे महिलेपासून पुरुष बनता येईल. पण फेब्रुवारी 2020 मध्ये आपण प्रेग्नंट आहोत हे अचानक त्याला समजलं. हे वाचा - कमालच झाली! चक्क एका माशाने केली Driving; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO पीएचडी स्टुटंड आणि मेन्टल हेल्थ वर्कर म्हणून काम करणाऱ्या ऐशने सांगितलं, एका डेटिंग अॅपवर एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली. त्या व्यक्तीसोबत त्याने एक रात्र घालवली होती. जेव्हा ऐशला प्रेग्नन्सीबाबत समजलं तेव्हा तो हैराण झाला. इतकंच नव्हे तर हार्मोन ट्रिटमेंट सुरू असताना तो प्रेग्नंट झाल्याने डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार ऐशला आपल्या लिंगाबाबत समस्या होती. आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे, हे तो ठरवू शकत नव्हता. पण जेव्हा प्रेग्न्सीबाबत समजलं तेव्हा त्याने बाळाला जन्म द्यायचं ठरवलं. त्याचवेळी त्याने आपली हार्मोन ट्रिटमेंट थांबवली. त्याने एका मुलीला जन्म दिला. जिचं नाव रोनन असं ठेवलं. हे वाचा - VIDEO - मैत्रिणीने अचानक सर्वांसमोरच दिलं गिफ्ट; नवरीबाईच नाही तर नवरदेवही लाजला ऐशने सांगितलं की तो आपला 28 वर्षांचा पती जॉर्डनसोबत राहतो. दोघंही आपल्या मुलीची खूप काळजी घेतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: America, Lifestyle, Pregnancy, Pregnant, World news

    पुढील बातम्या