मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

जिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला

जिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला

Alexa नसती तर आपला जीव गेला असता, असं म्हणत बॉडीबिल्डरनं (bodybuilder) तिचे आभार मानले आहेत.

Alexa नसती तर आपला जीव गेला असता, असं म्हणत बॉडीबिल्डरनं (bodybuilder) तिचे आभार मानले आहेत.

Alexa नसती तर आपला जीव गेला असता, असं म्हणत बॉडीबिल्डरनं (bodybuilder) तिचे आभार मानले आहेत.

    लंडन, 14 जानेवारी : Alexa हे कर, Alexa ते कर... Alexa तर अनेकांच्या आयुष्याची भागच झाली आहे. तिच्याशिवाय काही करणंच शक्य होती नाही. हीच amazon Alexa यूकेतील (UK) एका 40 वर्षांच्या व्यक्तीला तिनं नवं आयुष्य दिलं आहे. जिन्यावरून कोसळलेल्या बॉडीबिल्डरचा अॅलेक्सानं जीव वाचवला आहे. अॅलेक्सानंच मला वाचवलं, असं या व्यक्तीनं म्हटलं आहे. यूकेतील कँब्रिजशायरमध्ये राहणारा 40 वर्षांचा बॉडीबिल्डर डान्टे मॅक्नल्टी. जिन्यांवरून घसरला, त्याला गंभीर दुखापत झाली आणि तो बेशुद्ध झालं. पाच तासांनी तो शुद्धीवर आला. उठण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला जागेवरून उठताच येत नव्हतं, आपल्याला पाय नाहीत असंच त्याला वाट होतं. पायाला लकवा मारल्यासारखं झालं. डान्टेच्या मदतीला घरात दुसरं कुणीच नव्हतं तो एकटाच होता. कुणाला फोन करून बोलवायचं म्हटलं तर त्याच्याजवळ फोनही नव्हता. तो जिथं पडला होता तिथून फोन खूप दूर होता. काय करावं ते त्याला सूचत नव्हतं. इतक्यात त्याला अॅलेक्सा आठवली. हे वाचा - आपलं काम करून घेण्यासाठी बायकोचा अनोखा फंडा! नवऱ्याला तर शॉकच बसला सुदैवानं त्याच्या घरातील वाय-फाय सुरू होतं आणि अॅलेक्साही त्याच्या रेंजमध्ये होती. त्याने मोठ्यानं अॅलेक्साला हाक मारली आणि आपल्या मित्राला फोन लावायला सांगितलं. रुग्णालयात जाण्यासाठी आपात्कालीन नंबरही लावला. रुग्णालयाची टीम त्याच्या घरी आली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनाही तपासणी केली असता त्याच्या पायातील रक्तप्रवाहही थांबला होता. त्याला एक्युट कम्पार्टमेंट सिंड्रोम ही जीवघेणी समस्याही उद्भवली. त्याची परिस्थिती इतकी गंभीर होती की डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन करायला सांगितलं. ऑपरेशन केलं नसतं तर त्याचा जीवही गेला असता. हे वाचा - कायच्या काय! मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार! न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार एक महिनाभर त्याच्यावर रुग्णालयात उपचार झाले. त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. सध्या तो फिजोओथेरेपीही घेतो आहे. आपण बरे झालो यासाठी त्यानं मित्र, डॉक्टर्ससह अॅलेक्साचेही आभार मानले आहेत. अॅलेक्सा नसती तर माझा जीव वाचला नसता असं तो म्हणाला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Amazon, Health, Technology

    पुढील बातम्या