Home /News /lifestyle /

Onion Hacks : फक्त एका कांद्याचा घरातील या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग; पैसा आणि वेळही वाचेल

Onion Hacks : फक्त एका कांद्याचा घरातील या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग; पैसा आणि वेळही वाचेल

कांदा हा फक्त एक खाद्य घटक नसून त्याचा इतर काही कामांमध्येही आपण वापर करू शकतो. त्यामुळे बरीच कामे सोपी होतात. आज आपण कांद्याशी संबंधित अशा 3 हॅक्सबद्दल जाणून घेणार आहोत.

    मुंबई, 26 जून : जेवणाची चव वाढवण्यासाठी आपल्याकडे बहुतेक घरांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. चविष्ट करी बनवणे असो किंवा कोशिंबीर बनवणे असो, आपण कांदे नक्कीच वापरतो (Benefits of onion). अन्नात वापरण्यात येणारा हा कांदा आपण इतरही अनेक गोष्टींसाठी वापरू शकतो. कांदा हा फक्त एक खाद्य घटक नसून त्याचा इतर काही कामांमध्येही आपण वापर करू शकतो. त्यामुळे बरीच कामे सोपी होतात. आज आपण कांद्याशी संबंधित अशा 3 हॅक्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण स्वयंपाकघर, स्नानगृह आणि बागेतीस मूलभूत कामे करू शकता. कसे ते जाणून घेऊया. या प्रॉब्लेम्समध्ये कांदा उपयोगी - सिंकमधील किटक - बर्‍याच वेळा आपण स्वयंपाकघरात काम करत असतो आणि सिंकच्या नाल्यातील किटक-माशा अन्नपदार्थांवर गोंगावू लागतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण कांदे वापरू शकता. यासाठी प्रथम कांदा चिरून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तो गाळून पाणी स्प्रे बाटलीत भरा. आता त्या पाण्याच्या मदतीने सिंकमध्ये किंवा आजूबाजूला चांगले स्प्रे करा. असं केल्यानं कीटक, ड्रेन फ्लाय आपल्या घरात होणार नाहीत. जर तुमच्याकडे कांद्याची पूड असेल तर तुम्ही ती पाण्यात मिसळूनही वापरू शकता. हे वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा कीटकांपासून वनस्पतींचे संरक्षण - वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आपल्या बागेतील झाडांवर आले असतील, पाने खात असतील तर आपण कांद्याच्या मदतीनेही झाडे वाचवू शकता. यासाठी प्रथम कांदा चिरून घ्या आणि एक चमचा बेकिंग सोडा, एक कप पाणी आणि कांदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात अजून थोडं पाणी टाकून गाळून घ्या. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा. दर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी रोपांवर फवारणी करा. असे केल्याने कीटक कायमचे पळून जातील. हे वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या बाथरूममधील कीडे, अळ्या - कांद्याच्या साहाय्याने आपण बाथरूमच्या नाल्यातून येणारे किडे, अळ्या, माश्याही घालवू शकता. यासाठी एका कांद्याचे तीन ते चार तुकडे करून नाल्याभोवती ठेवा. कांद्याच्या वासाने किडे नाल्यातून पळून जातील. वरती सांगितलेल्या पद्धतीने स्प्रे करूनही अधून-मधून फवारू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Onion

    पुढील बातम्या