Home /News /lifestyle /

केसांसाठीच नाही स्कीन केअरमध्येही फायदेशीर आहेत जास्वंदीची फूलं; उन्हाळ्यात असा करा उपयोग

केसांसाठीच नाही स्कीन केअरमध्येही फायदेशीर आहेत जास्वंदीची फूलं; उन्हाळ्यात असा करा उपयोग

बहुतेक लोकांना औषधी घटक असलेल्या जास्वंदीच्या गुणधर्मांबद्दल माहिती नसते. जास्वंदीची फुलं केसांना निरोगी बनवण्‍यासाठी मदत करतात. जास्वंदीच्या फुलांचा वापर उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी करता येतो, त्याविषयी जाणून घेऊया.

    मुंबई, 25 मे : जास्वंदीची झाडे बहुतेक लोकांच्या बागेममध्ये किंवा घराभोवती दिसतात. जास्वंदीची फुले देखील वेगवेगळ्या प्रकारे वापरली जातात. पूजेची थाळी ते केसांची निगा राखण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर केला जातो. पण, स्कीन केअरमध्ये जास्वंदीच्या फुलांचे (Hibiscus flower) फायदे तुम्हाला माहीत आहेत का? केस गळती थांबवण्यासाठी रामबाण उपाय मानले जाणारे जास्वंदीचे फूल त्वचेसाठीही खूप फायदेशीर (Skin care tips) आहे. वास्तविक, बहुतेक लोकांना औषधी घटक असलेल्या जास्वंदीच्या गुणधर्मांबद्दल माहिती नसते. जास्वंदीची फुलं केसांना निरोगी बनवण्‍यासाठी मदत करतात. जास्वंदीच्या फुलांचा वापर उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी करता येतो. चला तर मग आम्ही तुम्हाला त्वचेसाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर आणि त्याचे काही आश्चर्यकारक फायदे सांगणार आहोत. जास्वंदीच्या फुलांसह दह्याचा फेस पॅक - उन्हाळ्यात चमकदार त्वचा मिळविण्यासाठी जास्वंदीची फुले वाळवून बारीक करा. आता 1 चमचा जास्वंदी फुलाच्या पावडरमध्ये 1 चमचा दही मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. जास्वंदीची फुले आणि दही यांचे मिश्रण त्वचेला मॉइश्चरायझ करून ग्लो आणण्यास मदत करते. जास्वंदी फूल आणि लव्हेंडर फेस पॅक - अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असलेला हा फेसपॅक चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. फेसपॅक बनवण्यासाठी 1 चमचा जास्वंदी फुलाची पावडर, 2 चमचे दही आणि 2-3 थेंब लॅव्हेंडर तेल मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 15-20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा वापरून पहा. जास्वंदी फुले आणि मधाचा फेस पॅक - हा फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा जास्वंदी फुलाची पावडर घ्या. आता त्यात 1 चमचा मध टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेस पॅक चेहऱ्याच्या मृत त्वचेच्या पेशी दुरुस्त करून त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करेल. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार जास्वंदीची फूलं आणि कोरफडीचा फेस पॅक औषधी घटकांनी समृद्ध असलेला हा फेस पॅक त्वचेवरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि डाग घालवण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी 1 चमचा जास्वंदीच्या फुलांपासून तयार केलेली पावडर घ्या. त्यात 1 चमचा कोरफड जेल टाकून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट कॉटन बॉलने चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम जास्वंदीची फूलं आणि मुलतानी मातीचा फेस पॅक उन्हाळ्यात तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय ठरू शकचो. यासाठी 1 चमचा जास्वंदी फुलाच्या पावडरमध्ये 1 चमचा मुलतानी माती आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Skin, Skin care

    पुढील बातम्या