नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर: सकाळची कोवळी सूर्यकिरणं अंगावर घेणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अलिकडे शहरांची अशी स्थिती झाली आहे की, घरांमध्ये सूर्यप्रकाश (sunlight) येणं फारच मुश्कील आहे. सूर्यप्रकाश मिळाला तरी अंगण मिळणे फार कठीण आहे. शेवटी अंगण उपलब्ध नसल्यास बाल्कनी योग्य पर्याय आहे किंवा थोडा वेळ काढून आपण सूर्यप्रकाशात फिरून येणं गरजेचं आहे. हिवाळ्यात सूर्यप्रकाश आपल्या संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर (Benefits sunlight) असतो.
हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेणं महत्वाचे का आहे?
आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांनी 'झी न्यूज'ला दिलेल्या माहितीनुसार, 'हिवाळ्याच्या मोसमात जितके जास्त खाणेपिणे आवश्यक आहे, तितकाच जास्त सूर्यप्रकाश घेणं आवश्यक आहे, कारण हिवाळ्यात सूर्यकिरणांचा परिणाम केवळ बाह्य त्वचेवरच होत नाही तर शरीराच्या आतील भागांवरही होतो. थंडीपासून वाचण्यासाठी लोक जास्त उबदार कपडे घालतात, त्यामुळे सूर्यप्रकाश शरीराला मिळण्याचे प्रमाणही कमी होते, त्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो आणि प्रतिकारशक्तीही कमी होते. या समस्या टाळण्यासाठी किमान 15 मिनिटे सूर्यप्रकाश घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
सूर्यप्रकाश घेण्याचे फायदे:
1. त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी होतो
सूर्यप्रकाशात असे चमत्कारी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरावर विविध प्रकारच्या संसर्गाचा परिणाम होण्याची शक्यता कमी होते. सूर्यप्रकाश घेतल्याने शरीरात डब्ल्यूबीसी (पांढऱ्या रक्त पेशी संख्या) ची पुरेशी निर्मिती होते, जी रोगास कारणीभूत घटकांशी लढण्याचे कार्य करते.
2. मुलांसाठी फायदेशीर
सूर्यप्रकाश घेणे मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. विशेषत: ज्या मुलांनी आईचे दूध पिणे बंद केले आहे, त्यांनी सूर्यप्रकाश घेण्याबरोबरच व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
3. कर्करोग (कॅन्सर) प्रतिबंध
ज्यांना कॅन्सर झाला आहे, त्यांना उन्हापासून या आजारात आराम वाटतो, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. अनेक संशोधनांतून हे समोर आले आहे की, जिथे कमी सूर्यप्रकाश असतो किंवा जे लोक उन्हात कमी वेळ घालवतात, तिथे कॅन्सरचा धोका जास्त असतो.
हे वाचा - हिवाळ्यात ही पालेभाजी खाण्याचे आहेत भरपूर फायदे; रोगप्रतिकारकशक्ती वाढेल, अनेक आजार राहतील दूर
4. व्हिटॅमिन डी मिळते
दररोज सूर्यप्रकाश घेतल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय सूर्यस्नान केल्याने सांधेदुखी आणि थंडीमुळे होणारे अंगदुखी यापासूनही आराम मिळतो.
5. चांगली झोप लागते
डॉ अबरार मुलतानी यांच्या मते, सूर्यस्नान केल्याने आपल्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार होतो. या हार्मोनमुळे चांगली आणि शांत झोप लागते. याशिवाय मानसिक ताणही कमी होतो.
हे वाचा - Mud Pack benefits: तळव्यांना या मातीचा चिखल लावल्याने मिळतात जबरदस्त फायदे, जाणून घ्या पद्धत
(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Winter session