Home /News /lifestyle /

Types Of Milk : साध्या दुधासाठी पर्याय शोधताय? या प्रकारचे दूध तुमच्या आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

Types Of Milk : साध्या दुधासाठी पर्याय शोधताय? या प्रकारचे दूध तुमच्या आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

बऱ्याच लोकांना असे वाटते की दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे वजन वाढते आणि काही लोकांना दुधाची चवच आवडत नाही. परिणामी आजकाल बहुतेक लोक त्यांच्या आहारात दुधाचा वापर कमी होतो.

  मुंबई, 5 ऑगस्ट : हल्ली लोक आपल्या तब्येतीबद्दल खूप काळजी करत असतात. यामुळे ते वजन वजन वाढवणारे अनेक पदार्थ आपल्या आहारातून काढून टाकत आहेत. बऱ्याच लोकांना असे वाटते की दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे वजन वाढते आणि काही लोकांना दुधाची चवच आवडत नाही. परिणामी आजकाल बहुतेक लोक त्यांच्या आहारात दुधाचा वापर कमी होतो. मात्र याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसते. जर तुम्हाला साध्या दुधाची चव आवडत नसेल किंवा सध्या दुधाप्रमाणेच पौष्टिक काहीतरी वेगळे हवे असेल तर आज आम्ही तुम्हाला काही वेगळ्या प्रकारच्या दुधांबद्दल माहिती देणार आहोत. बदाम दूध तुमची हाडे कमकुवत असतील तर तुम्ही बदाम दूध पिणे चांगले राहील. बदामाच्या दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि याची चवही चांगली असते. मात्र, त्यात कॅलरी आणि प्रथिनांचे प्रमाण खूपच कमी असते. पोटॅशियम किंवा कॅल्शियमची कमतरता असल्यास बदामाचे दूध पिण्याचा तुम्हाला फायदे होईल. त्याचबरोबर बदामाच्या दुधात कोलेस्ट्रॉल खूप कमी असते. त्यामुळे हृदयरोग्यांसाठीषी खूप फायदेशीर ठरते. ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा सोया मिल्क सोया मिल्क्मध्ये गाईच्या दुधापेक्षा जास्त पोषक तत्व असतात. यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते आणि कॅलरीज कमी असतात. सोया मिल्कमध्ये आढळणारे अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म कर्करोगाचा धोका कमी करतात. सोया मिल्क प्यायल्याने अशक्तपणा आणि थकवा दूर होतो आणि दिवसभर उर्जा टिकून राहते. सोया मिल्क प्यायल्याने फॅट झपाट्याने कमी होते, त्यामुळे वजन कमी होते किंवा नियंत्रणात राहते. नारळाचे दुध तुम्हाला कॅलरीयुक्त आहार घ्यायचा असेल तर तुम्ही नारळाचे दूध आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. नारळाच्या दुधामध्ये कॅलरीज खूप जास्त असतात. यामध्ये 100 ग्रॅम दुधात 150 ते 200 ग्रॅम कॅलरीज मिळू शकतात. कॅलरीजचे प्रमाण देखील दुधाच्या शुद्धतेवर अवलंबून असते.

  Pregnancy Tips : गरोदरपणात कॉफी पिणे सुरक्षित असते का? आरोग्यावर कसा होतो परिणाम

  काजू दूध तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असल्यास काजूचे दूध तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण त्यात लोह भरपूर असते. याशिवाय ते तुमच्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. काजूच्या दुधात कॉपर असते जे प्रोटीन तयार होण्यास मदत करते. त्यात कार्बोहायड्रेट खूप कमी असते, म्हणजेच लठ्ठपणाची समस्या उद्भवत नाही.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Milk combinations

  पुढील बातम्या