रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्या गरमागरम बदामाचा काढा

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्या गरमागरम बदामाचा काढा

सध्या कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप गरजेचं आहे आणि हीच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या काढ्याची मदत होईल.

  • Last Updated: Jul 28, 2020 07:35 PM IST
  • Share this:

कामाच्या ताणाने शारिरीक आणि मानसिक थकवा येतो, त्यामुळे ताजेतवाने होण्यासाठी लोक चहा, कॉफी पिणे पसंत करतात. त्याच प्रकारे काश्मीरमधील लोक काश्मिरी काढा म्हणजेच बदामाचा काढा पिणे पसंत करत. काश्मीरमध्ये थंडी अधिक असल्याने त्या लोकांना बदामाचा काढा आवडतो, तो थंडीपासून बचाव तर करतोच पण आरोग्यवर्धकही आहे. हा काढा हे लोक अगदी चहा-कॉफी सारखा पितात. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्या मते, बदामामध्ये अनेक पोषक द्रव्ये असतात. पूर्वी बदाम मिठाई आणि इतर पदार्थांमध्ये घातले जात आता ते कॉफीमध्ये पण वापरतात.

असे करावे सेवन

काश्मीरमध्ये लोक काढा घेताना त्यात अनेक पदार्थ घालतात, जसे हिरव्या पानांचा चहा, दालचिनी, वेलची, केशर आणि लवंग. यामुळे काढा चविष्ट होतो. त्याला अधिक चांगला करण्यासाठी त्यात अक्रोड आणि इतर सुकामेव्याची भुकटी करून टाकली जाते. त्याने हा काढा सुगंधित आणि पौष्टिक होतो.

बदामाच्या काढ्याचे गुण

काश्मिरी काढ्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अँटीजनोटॉक्सिक गुण असतात. तो प्रकृतीने उष्ण असल्याने शरीरातील विषारी पदार्थ काढण्याचे काम करतो. पावसाळ्यात प्यायल्यास शरीराला जीवाणू पासून बचाव करतो. हंगामी आजारापासून वाचण्यासाठी अशा प्रकारे त्याची मदत होते. चला जाणून घेऊ त्याचे फायदे -

ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे त्यांच्यासाठी हा काढा उपयुक्त आहे. हा काढा प्यायल्याने रक्त शर्करा नियंत्रणात राहते. जसे ग्रीन टी वजन नियंत्रित करते तसंच हा बदामाचा काढाही वजन नियंत्रणात ठेवतो. काढा प्यायल्याने पोट भरलेले राहते, परिणामी भूक कमी लागते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

काश्मिरी काढ्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि तणावही कमी होतो. यातील अँटीऑक्सिडंटमुळे तो कर्करोगापासूनही बचाव करतो. पचनसंस्थेसाठी हा काढा उत्तम आहे. हा त्वचेसाठी देखील चांगला आहे. यातील चहा आणि केशर यात असलेले जीवनसत्व बी 12 आणि बदामातील जीवनसत्व ई त्वचेला पोषण देतात. त्यामुळे त्वचा मुलायम होते.

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, बदामामुळे पित्ताचा त्रास नाहीसा होतो आणि पोटासाठी आवश्यक प्रथिने मिळतात.

काश्मिरी काढा बनवण्याची पद्धत

काश्मिरी काढा बनवण्यासाठी 2 मोठे चमचे ग्रीन टी, दालचिनीचे काही तुकडे, वेलची, थोडंसं केशर, साखर आणि मध घ्या. बदाम आणि अक्रोड बारीक करून घ्या. भांड्यात एक ग्लास पाणी घ्या त्यात दालचीनीचे काही तुकडे, वेलची, थोडेसे केशर, टाकून उकळा ते चांगले गाढ होऊ द्या. नंतर त्यात ग्रीन टी घाला आणि ते पाणी पुन्हा उकळा, कडवटपण जास्त येऊ नये याची काळजी घ्या. त्याला गाळून घ्या आणि त्यात बारीक केलेले बदाम आणि अक्रोड घालून सजवा, आणि गरम गरम काढा प्या.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - संसर्गजन्य रोग

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 28, 2020, 7:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading