जाणून घ्या दररोज बदाम खाल्ले तर शरीरावर त्याचा असा होतो परिणाम

जाणून घ्या दररोज बदाम खाल्ले तर शरीरावर त्याचा असा होतो परिणाम

बदाम कडू आणि गोड अशा दोन्ही प्रकारचे असतात, पण त्यातही गोड बदाम खाल्ले जातात. बदामात लोह, तांबे, फॉस्फरस अशी अनेक जीवनसत्त्व असतात.

  • Share this:

थंडीची चाहूल अजून लागली नसली तरी हिवाळ्यात जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. त्यातही  थंडीत आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी बदाम खाल्ले जातात. बदामानं शरीर आणि मन निरोगी राहतं. बदामाला सुक्या मेव्याचा राजा म्हटलं जातं. बदाम कडू आणि गोड अशा दोन्ही प्रकारचे असतात, पण त्यातही गोड बदाम खाल्ले जातात. बदामात लोह, तांबे, फॉस्फरस अशी अनेक जीवनसत्त्व असतात.

दररोज बदाम खाण्याचे फायदे-

- बदाम खाल्ल्यानं उत्साह वाढतो. मेंदू, मज्जातंतू, हाडं, हृदय आणि यकृत यांचं कार्य सुरळीत चालतं. हाडं मजबूत होतात.

- बदाम खाल्ल्यानं अशक्तपणा कमी होतो.

- जुनाट मलावरोधावर बदाम सारक आहे. झोपताना 11 ते 15 बदाम खाल्ल्यास सकाळी पोट साफ होतं.

- बदामाचं दूध सर्वात पौष्टिक मानलं जातं. ते पचायलाही हलकं असतं.

- बदाम सौंदर्यवर्धक आहे.बदामाची पेस्ट,दुधाची साय आणि गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून चेहऱ्याला लावल्या तर चेहरा तेजस्वी होतो. त्वचा मुलायम होते.

- बदामाचं तेल आणि एक चमचा आवळ्याचा रस केसांच्या मुळाशी लावल्यास केस गळणं कमी होतं. केसात कोंडा झाला असेल तर हे तेल उपयोगी पडतं.

- बदामाची पूड पाण्यात घालून घेतली तर कफापासून आराम मिळतो. घसा खवखवत असेल तर बदामाची पूड फायदेशीर.

- बदाम पाण्यात भिजत घालूनच सोलून खावेत. शक्यतो सकाळी बदाम खाल्ले तर आरोग्याला गुणकारी असतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

आता केस पांढरे करण्यासाठी केमिकलची गरज नाही, या नैसर्गिक पद्धतींचा करा वापर

मुलगी वयात आल्यानंतर या राज्यात साजरा होतो उत्साह!

या घरगुती उपायांनी दाताच्या दुखण्यावर मिळवू शकता आराम

मुलींशी फेसबुकवर बोलण्यापूर्वी या नियमांचा नीट विचार करा,कधीच होणार नाही रिजेक्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2019 05:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading