• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • पोषक घटकांनी समृद्ध असतात अंडी; पण त्यासोबत हे Food Combinations ठरेल आरोग्याला घातक

पोषक घटकांनी समृद्ध असतात अंडी; पण त्यासोबत हे Food Combinations ठरेल आरोग्याला घातक

आरोग्य तज्ज्ञ फूड कॉम्बिनेशनकडे खूप लक्ष देण्याची शिफारस करतात. आयुर्वेदानुसार, चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे थकवा, मळमळ आणि पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : जागतिक अंडी दिन 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. अंड्यांच्या फायद्यांविषयी (Egg Health Benefits) जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. अंड्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, पण हे देखील खरे आहे की योग्य वेळी योग्य गोष्टी खाल्ल्याने शरीराला फायदा होतो. वेगवेगळ्या वेळी दोन गोष्टी खाणे निरोगी असू शकते, पण त्या एकत्र खाण्याचे काही तोटेही असू शकतात. आरोग्य तज्ज्ञ फूड कॉम्बिनेशनकडे खूप लक्ष देण्याची शिफारस करतात. आयुर्वेदानुसार, चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे थकवा, मळमळ आणि पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. अंड्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. लोक वेगवेगळ्या प्रकारे अंड्यांच्या रेसिपी बनवून खातात. तज्ज्ञांच्या मते, काही गोष्टी अंड्यांसोबत खाऊ नयेत. साखर - अंडी कधीही साखरेबरोबर खाऊ नयेत. जर तुम्ही अंडी आणि साखर एकत्र शिजवले तर दोघांमधून बाहेर पडणारे अमीनो अ‌ॅसिड शरीरासाठी विषारी ठरू शकतात. या संयोजनामुळे (Combination) आपल्याला रक्त गोठण्याच्या समस्या देखील येऊ शकतात. सोया दूध - सोया दूध आणि अंडी शरीरासाठी स्वतंत्रपणे खूप फायदेशीर असतात, पण त्यांना एकत्र खाणे चांगले मानले जात नाही. तज्ज्ञांच्या मते, सोया दुधासोबत अंडी खाल्याने शरीरातील प्रथिनांचे शोषण थांबते. हे वाचा - शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची FPO योजना, मिळेल 15 लाखांपर्यंतचं कर्ज; असा करा अर्ज अंडी आणि मासे - अंडी आणि मासे कधीही एकत्र खाऊ नयेत. यामुळे तुम्हाला एलर्जीची समस्या उद्भवू शकते. माशांप्रमाणे पनीर अंड्यांसोबत खाऊ नये. या संयोजनामुळे एलर्जीसह अनेक रोगांचा जन्म होऊ शकतो. चहा - चहा अनेकांचे लाडके पेय आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी चहासोबत खातात. अंड्यांपासून बनवलेल्या वस्तू खाल्ल्यानंतर काही लोक ते पचवण्यासाठी चहा पितात. तज्ज्ञांच्या मते, ही सवय तुमच्या शरीराला हानी पोहोचवण्याचे काम करते. अंडी खाल्ल्यानंतर चहा प्यायल्याने बद्धकोष्ठता होते. हे वाचा - ‘…तुम्हाला काम देतो’ सांगत डोंगरावर नेऊन महिलेसोबत भयावह कृत्य; पुण्यातील धक्कादायक घटना काही फळे आणि भाज्या - केळी, टरबूज, चीज, दुग्धजन्य पदार्थ आणि बीन्स अंड्यांसोबत खाऊ नयेत. अंड्यांसह या गोष्टींच्या संयोजनामुळे फायद्याऐवजी हानी होते. अंड्यांसह या गोष्टी खाल्ल्याने पोट, गॅस आणि आतड्यांशी संबंधित समस्या निर्माण होतात. दुसरीकडे अंड्यांसह लिंबाचे सेवन हृदयासाठी चांगले मानले जात नाही.
  Published by:News18 Desk
  First published: