Home /News /lifestyle /

विवाहित व्यक्तीने बाहेर संबंध ठेवणं हा गुन्हा आहे, Live In Relationship नाही - कोर्टाचं स्पष्टीकरण

विवाहित व्यक्तीने बाहेर संबंध ठेवणं हा गुन्हा आहे, Live In Relationship नाही - कोर्टाचं स्पष्टीकरण

Live in Relationship ला कायद्याने मान्यता मिळाल्यानंतर आता या संबंधांबाबतचा मोठा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच दिला.

    प्रयागराज, 21 जानेवारी: अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High court)  लिव-इन-रिलेशन (Live in relationship) संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय (Judgement) दिला. 19 जानेवारीला न्यायालयाने दिलेल्या आपल्या निर्णयात म्हटलं की, जर विवाहित महिला दुसर्‍या पुरुषासोबत नवरा-बायकोसारखं राहत असेल तर, अशा नातेसंबंधांना लीव- इन रिलेशनशिप म्हणता येणार नाही. ती ज्या पुरुषासोबत एकत्र राहत आहे, अशा व्यक्तीला आयपीसीच्या कलम 494 / 495 नुसार गुन्हेगार ठरवलं जाईल. हाथरस येथील आशा देवी आणि अरविंद यांची याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती एस पी केशरवाणी आणि न्यायमूर्ती वाय के श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. हाथरस येथील रहिवाशी असलेली आशा देवी ही महेश चंद्र यांची विवाहित पत्नी आहे. या दोघांमध्ये अद्याप घटस्फोट झालेला नाही. असं असताना आशा देवी आपला नवरा सोडून या वेगळ्याच परपुरुषासोबत नवरा-बायकोप्रमाणे राहत होती. या प्रकरणांवरून घरातील कुटुंबियांकडून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण जेव्हा न्यायालयात खेचलं गेलं, तेव्हा त्यांनी लीव-इन-रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचं सांगितलं. यावरून न्यायालयाने या जोडप्याची कानउघडणी केली आहे. तसेच हे लीव-इन रिलेशन नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे. हे गैरवर्तन असून हा एक गुन्हा आहे. त्यामुळे संबंधित परपुरुष अपराधी असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. दोघंही लीव इन रिलेशनशिपमध्ये राहत असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून संरक्षण दिलं जावं, असं या याचिकेत म्हटलं होतं. यावेळी न्यायालयानं म्हटलं की, धर्म परिवर्तन करून विवाहित महिलेसोबत लीव-इन रिलेशनमध्ये राहणं देखील गुन्हा आहे. यामध्ये अवैध संबंध ठेवणारा पुरुष गुन्हेगार असतो. अशा संबंधांना कायदेशीर मानलं जाऊ शकत नाही. कोर्टाने पुढे असंही म्हटलं की, जी लोकं कायदेशीररित्या लग्न करू शकत नाहीत, अशा लोकांनी लीव-इन रिलेशनशिपमध्ये राहणं, एकापेक्षा अधिक जोडीदाराशी संबंध ठेवणं हा गुन्हा आहे. अशा पद्धतीनं लीव इन रिलेशनशिप राहण्याला वैवाहित जीवन मानलं जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा लोकांना न्यायालयाकडून संरक्षण दिलं जावू शकत नाही, असंही या निर्णयात म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या