…म्हणून सोन्या आणि हिऱ्यापेक्षा जास्त आहे व्हेल माशाच्या उलटीची किंमत!

उलटी...नुसता शब्द जरी उच्चारला तर अनेकांना किळस वाटेल. पण आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र याच उलटीची कोट्यवधीमध्ये किंमत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 12:26 PM IST

…म्हणून सोन्या आणि हिऱ्यापेक्षा जास्त आहे व्हेल माशाच्या उलटीची किंमत!

उलटी...नुसता शब्द जरी उच्चारला तर अनेकांना किळस वाटेल. पण आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र याच उलटीची कोट्यवधीमध्ये किंमत आहे. तुम्हाल ऐकून धक्का बसेल मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सोन्या आणि हिऱ्यापेक्षा उलटी जास्त किंमतीला विकली जाते. ही उलटी आहे व्हेल माशाची. त्यामुळं जिथे जिथे लोकांना व्हेल मासा दिसतो, तिथं तिथं लोकांची नजर ही माशाच्या उलटीवर असते. एवढेच नाही तर व्हेल माशाच्या उलटीची तस्करीही मोठ्या प्रमाणावर केली जाते.

भारतात कोकण किनारपट्टीवर काही काळापासून व्हेल मासा पाहिला जात आहे. त्यामुळं कोकण किनारपट्टीवर कोळी लोकं व्हेल माशाची उलटी शोधण्यासाठी धडपडत असतात. असे मानले जाते की व्हेल माशाची उलटी लगेचच दगडासारखी होते. त्यानंतर उलटीची किंमत दुप्पट होते.

काय आहे व्हेल माशाच्या उल्टी मागचे रहस्य

वैज्ञानिकांच्या मते अजूनही हे सिद्ध झाले नाही आहे की, ही नक्की व्हेल माशाची उलटी आहे की तिच्या शरीरातील मळ आहे. काही वेळा व्हेल माशाच्या शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. साधारणत: व्हेल मासा हा समुद्र किनाऱ्यापासून खुप दूर असतो. त्यामुळं व्हेल माशाच्या शरीरातून बाहेर निघालेला हा पदार्थ किनाऱ्यावर येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. याचे वजन 15 किलोग्रॅमपासून 50 किलोपर्य़ंत असते.

वाचा-8.5 फूटाचा मासा, किंमत 23 कोटी! पाहा काय केलं ‘एका कोळियानं’

Loading...

का आहे बाजारात एवढी किंमत

व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अॅम्बरग्रीस अत्तर किंवा सुगंधित उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनं विकले जाते. त्यात अॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. तर, काही देशांमध्ये अॅम्बरग्रीसचा वापर सुगंधित सिगरेट तयार करण्यासाठी होतो. प्राचीन चीनमध्ये या पदार्थाला ‘ड्रॅगननं थुकलेला सुगंध’, असे ओळखले जाते.

वाचा-iPhoneचा नाद करायचा नाय! एक वर्षापूर्वी नदीत पडलेल्या फोनचं पाहा काय झालं

भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते तस्करी

गेल्या वर्षी ठाणे क्राईम ब्रॉंचनं व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. व्हेल मासा करत असलेली उलटी ही जागतिक बाजारात महागडे पर्फ्युम बनवण्याकरता वापरली जाते. ठाणे क्राईम ब्रांचने पकडलेल्या तस्करांच्या टोळीकडून व्हेल माशाची उलटी आणि खवल्या मांजराच्या खवल्या असा 20 कोटी रुपये किमतीचा माल जप्त केला होता. तीन जणांच्या या टोळीनं कोकण किनारपट्टीतील समुद्रावरून व्हेल माशाची उलटी आणि खवल्या मांजराच्या खवल्या मिळवल्या होत्या.

वाचा-अतीशहाणपणा नडला! सिंहाच्या पिंजऱ्यात घुसली महिला, पाहा हा VIRAL VIDEO

VIDEO: प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2019 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...